Festival Offer : Maruti Suzuki Celerio झाली स्वस्त, तब्बल इतक्या हजार रुपयांनी कमी झाली किंमत

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मारुती सुझुकीने Celerio कारच्या किमतीत तब्बल 94 हजार रुपयांपर्यंत कपात जाहीर केली आहे.
Festival Offer : Maruti Suzuki Celerio झाली स्वस्त, तब्बल इतक्या हजार रुपयांनी कमी झाली किंमत

मुंबई: सणासुदीच्या काळात कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी मारुती सुझुकीने मोठा आनंदाची बातमी दिली आहे. कंपनीने लोकप्रिय हॅचबॅक Celerio च्या किंमतीत तब्बल 94 हजार रुपयांपर्यंत कपात जाहीर केली आहे. जीएसटी दरामध्ये झालेल्या बदलांनंतर हे दर लागू झाले असून, आता ही कार आणखी परवडणाऱ्या बजेटमध्ये उपलब्ध होणार आहे. मारुती सुझुकीची Celerio जरी देशातील सर्वाधिक विक्री होणारी हॅचबॅक नसली तरी, ती स्वस्तात विश्वासार्ह आणि कॉम्पॅक्ट कार घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी नेहमीच एक चांगला पर्याय राहिली आहे. Alto K10 ऐवजी थोडी जास्त फीचर्स असलेली छोटी कार घ्यायची इच्छा असणाऱ्यांसाठी हे मॉडेल अधिक आकर्षक ठरते.

Celerio च्या विविध व्हेरिएंटमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात किंमत कमी करण्यात आली आहे.बेस व्हेरिएंट LXi मध्ये सर्वाधिक 94,000 रुपयांची कपात झाली आहे.तर टॉप मॉडेल ZXi Plus MT मध्ये सुमारे 59,000 रुपयांची घट करण्यात आली आहे. मॅन्युअल गिअरबॉक्स असलेल्या मॉडेल्समध्ये 59,000 ते 94,000 रुपयांपर्यंत कपात झाली आहे.एएमटी गिअरबॉक्स असलेल्या ट्रिम्समध्ये 66,000 ते 89,000 रुपयांपर्यंत दर कमी झाले आहेत.

हेही वाचा: OMG! 'या' कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना दिला iPhone 17 Pro Max; कोण आहे आयफोन देणारा 'जगातील सर्वोत्तम बॉस'

नवीन डिझाइनसह आलेली ही हॅचबॅक आता अनेक कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. यात स्पीडी ब्ल्यू, आर्क्टिक व्हाईट, सिल्की सिल्व्हर, सॉलिड फायर रेड, कॅफीन ब्राउन, पर्ल ब्लुईश ब्लॅक आणि ग्लिस्टनिंग ग्रे यांचा समावेश आहे. Celerio मध्ये 1.0-लिटर नॅचरल्ली ऍस्पिरेटेड थ्री-सिलिंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. याशिवाय काही व्हेरिएंट्समध्ये फॅक्टरी-फिटेड CNG किट सुद्धा उपलब्ध आहे.पेट्रोल व्हर्जनचे मायलेज 25.24 किमी/लीटर ते 26.68 किमी/लीटरपर्यंत आहे. CNG व्हर्जन 34.43 किमी/किलोपर्यंतचे मायलेज देते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version