आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. मलिकांवर झालेल्या चौकशीनंतर विरोधकांनी आनंद साजरा केला. तर मलिकांच्या अटेकवर आनंद साजरा करणे भाजप नेते मोहित कंबोज यांना चांगलेच महागात पडले आहे.
नवाब मलिक यांच्या अटकेनंतर मोहित कंबोज यांनी आनंद साजरा केला. कंबोज यांनी आपल्या समर्थकांसोबत स्वत:च्या घराबाहेर फटाके फोडून जल्लोष साजरा केला. मात्र उत्साहाच्या भरात केलेल्या एका कृतीमुळे आता कंबोज अडचणीत आले आहेत. यावेळी भाजप समर्थकांनी पक्षाचे झेंडे घेत जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा केल्या. उत्साहाच्या भरात मोहित कंबोज यांनी म्यानातून तलावार काढून ती हवेत फिरवत जल्लोष साजरा केला. त्यामुळे याप्रकरणी मोहित कंबोज यांच्यावर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे मोहित कंबोजच्या अडचणीत वाढ झाली आहे.
मोहित कंबोज यांच्या जल्लोषाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेत सांताक्रुझ पोलीस स्थानकामध्ये कंबोज यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन तसेच सार्वजनिक ठिकाणी तलवार काढल्याप्रकरणी कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.