मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या यास (Yaas Cyclone) चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या चक्रीवादळामुळे लाखो लोकांचे नुकसान झाले शिवाय यामध्ये अनेक गावे जलमय झाली आहे. आता हे वादळ झारखंड राज्यावर घोंघावत असून त्याचा फटका महाराष्ट्रालाही बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील तीन दिवस राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये काही भागात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यास चक्रीवादळ हे बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकलं होतं. या वादळाचा ताशी वेग 155 ते 165 किमी इतका होता. वारे वेगाने वाहत असल्याने याठिकाणी अनेक झाडे जमिनीवर कोसळले आहे. तसेच मुसळधार पाऊस हे किनारपट्टी लगतच्या जिल्ह्यांमध्ये 24 तासांत 200 मिमीहून अधिक कोसळला. बंगालमध्येही अनेक जिल्ह्यांत हीच स्थिती होती. त्यामुळे समुद्राचे पाणीही अनेक गावांमध्ये घुसले होते. आता वादळची तीव्रता कमी झाली असली तरी अजूनही हे वादळ झारखंड, छत्तीसगढ, बिहार या राज्यांत ते सक्रिय आहे. आता सध्या हे वादळ झारखंडमध्ये सक्रिय असल्याने अनेक भागात जोराचे वारे वाहत आहे शिवाय याठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. महाराष्ट्रामध्येही 11 जिल्ह्यांवरही वादळाचे सावट आहे. पुढील तीन दिवस पूर्व विदर्भातील काही भाग, अमरावती अकोला, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर तसेच , जालना, लातूर, नांदेड, , कोकणातील रत्नागिरी, सिंधूदुर्ग, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, या जिल्ह्यांतील तुरळक भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या काही भागात वादळी वारे वाहतील, असा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच, अरबी समुद्रात निर्माण झालेले तोक्ते चक्रीवादळ पूर्णपणे ओसरले आहे तर आणखी एका वादळाला समोरी जाव लागत आहे. मागील वर्षीही राज्याला निसर्ग वादळाचा तडाखा बसला होता. मागील काही वर्षांत अरबी समुद्रात सातत्याने कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन वादळे येत आहेत. हा परिणाम हवामान बदलाचा असल्याचे हवामान विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. 1990 पासून अरबी समुद्रांत तयार होणाऱ्या वादळांच्या ट्रेंड वाढला आहे. एका अभ्यासानुसार हवामान बदलामुळे वादळांची तीव्रता वाढत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण यावरील पुरेसा अभ्यास व विश्लेषण नाही, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.