Maharashtra ATS : दहशतवादी प्रचार साहित्य ऑनलाइन शेअर करणाऱ्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला अटक; एटीएसची मोठी कारवाई

महाराष्ट्र ATS पथकाने इंजिनिअरिंगचा विद्यार्थी अयान शेखला अटक केली आहे.
Maharashtra ATS  : दहशतवादी प्रचार साहित्य ऑनलाइन शेअर करणाऱ्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला अटक; एटीएसची मोठी कारवाई

मुंबई : मुंबईत Maharashtra Anti-Terrorism Squad (ATS) ने मोठ्या ऑनलाइन दहशतवादी नेटवर्कचा भांडाफोड केला असून इंजिनिअरिंगचा विद्यार्थी अयान शेखला अटक केली आहे. तपासात तो सुमारे सहा महिन्यांपासून जैश-ए-मोहम्मदचा ‘स्लीपर सेल’ म्हणून काम करत असल्याचे समोर आले आहे. एटीएसच्या माहितीनुसार अयान शेख तरुणांना कट्टरपंथी बनवून दहशतवादी संघटनेत भरती करण्याचा प्रयत्न करत होता. त्याने आपल्या दोन मित्रांचे ब्रेनवॉश करून त्यांना देशाबाहेर जाऊन दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होण्यासाठी तयार केले होते. या दोन्ही विद्यार्थ्यांचे जबाब एटीएसने नोंदवले आहेत.

हेही वाचा : Sangli Crime : आधी धारदार शस्त्राने वार केला, नंतर बॅरलमध्ये कोंबलं…; सांगलीतील या घटनेने परिसरात खळबळ

तपासात असेही उघड झाले की अयानला पाकिस्तान आणि सौदी अरेबियातून क्रिप्टोकरन्सीद्वारे आर्थिक मदत मिळत होती. एटीएस त्याचे बँक खाते आणि पैशांचा मागोवा (मनी ट्रेल) तपासत आहे. अयानच्या मोबाईलच्या फॉरेन्सिक तपासात मसूद अझहर आणि हाफिज सईद यांचे ऑडिओ-व्हिडिओ सापडले असून तो टेलिग्रामसारख्या एन्क्रिप्टेड अॅपद्वारे परदेशातील हँडलर्सच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणानंतर मुंबईत सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून मुंबई पोलीस गुन्हे शाखेनेदेखील तपासात सहभागी झाली आहे. एटीएसने या प्रकरणाची माहिती इतर केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनाही दिली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version