भारतामध्ये कर्ज घेण्याच्या सवयी झपाट्याने बदलत असून Gen Z आणि मिलेनियल्स हे दोन वर्ग डिजिटल लेंडिंगच्या केंद्रस्थानी आले आहेत. विविध फिनटेक आणि क्रेडिट अहवालांनुसार, भारतातील एकूण रिटेल कर्जांपैकी मोठा हिस्सा या दोन पिढ्यांकडून घेतला जात आहे. रिपोर्टनुसार, मिलेनियल्स अजूनही एकूण कर्ज वितरणात सर्वात मोठा वाटा उचलतात. एका अभ्यासानुसार, FY24 मध्ये मिलेनियल्सनी सुमारे 25–28 लाख कोटींचे कर्ज घेतले, तर Gen Z ने सुमारे 3.5–4 लाख कोटी कर्ज घेतले.
मात्र, Gen Z कर्ज घेण्याच्या वेगात आणि नवीन ग्राहक (first-time borrowers) म्हणून आघाडीवर आहे. 2025–26 मध्ये Gen Z हे भारतातील नवे क्रेडिट वापरकर्त्यांपैकी सुमारे 41% हिस्सा बनवत असल्याचे रिपोर्टमध्ये दिसते.
कशासाठी घेतले जात आहेत कर्ज?
ट्रॅव्हल आणि लाइफस्टाइल खर्च
स्मार्टफोन, गॅजेट्स आणि टेक अपग्रेड
शिक्षण आणि काही प्रमाणात गरजेचे खर्च
विशेष म्हणजे Gen Z मध्ये पर्सनल लोनचा वापर अधिक “experiential spending” साठी होत आहे, तर मिलेनियल्समध्ये होम लोन आणि मोठ्या आर्थिक उद्दिष्टांसाठी कर्जाचा वापर जास्त दिसतो.
नवीन ट्रेंड काय सांगतो?
तज्ज्ञांच्या मते, भारतातील कर्ज बाजारात एक मोठा बदल होत आहे:
पारंपरिक बँकिंगपेक्षा डिजिटल लोनला प्राधान्य
'लाइफस्टाइल क्रेडिट'चा वाढता ट्रेंड
कमी वयातच कर्ज घेण्याची सुरुवात
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.