Ketan Agrawal Case : केतनला धक्का दिला, त्याच्या फोनमधून पुरावे नष्ट केले, पण…; सियाने डिलिट केलेला महत्त्वाचा डेटा रिकव्हर? मोठे धागेदोरे हाती लागणार

केतनला लोहगडावरून ढकलून दिल्यानंतर दोन्ही कुटुंब घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच सिया आणि चेतनने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याचा खुलासा झाला आहे. 
Ketan Agrawal Case : केतनला धक्का दिला, त्याच्या फोनमधून पुरावे नष्ट केले, पण…; सियाने डिलिट केलेला महत्त्वाचा डेटा रिकव्हर? मोठे धागेदोरे हाती लागणार

18 जून रोजी पुण्यातील लोहगडावरून केतन अग्रवाल याला त्याच्याच होणाऱ्या बायकोने सियाने आणि तिचा प्रियकर चेतन याने 350 फूट खोल दरीत ढकलून दिले. या प्रकरणाचा उलघडा होताच पोलीस प्रशासनाने तपासयंत्रणा अलर्ट करून दोघांनाही ताब्यात घेतले. सध्या दोघांना 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून या प्रकरणाचा शोध जलदगतीने सुरु आहे.

दरम्यान या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. तसेच सिया आणि चेतनचे काही व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच एक मोठी माहिती समोर आली आहे. केतनला लोहगडावरून ढकलून दिल्यानंतर दोन्ही कुटुंब घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच सिया आणि चेतनने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याचा खुलासा झाला आहे. 

हेही वाचा- Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल मृत्युप्रकरणी महत्त्वाचा धागा हाती; सिया आणि चेतनचा स्नॅपचॅट व्हिडिओ व्हायरल, बनू शकतो मोठा पुरावा

समोर आलेल्या माहितीनुसार, ठरल्याप्रमाणे निर्जन ठिकाणी पोहोचताच सिया जमिनीवर बसली. सियाने हा इशारा दिल्यानंतर चेतनने मागून वेगाने येत केतनला थेट 350 फूट खोल दरीत ढकलून दिले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतनने केतनला ढकलण्यापूर्वीच सियाने केतनचा फोन स्वतःच्या ताब्यात घेतला होता. त्यानंतर केतनचे कुटुंबीय घटनास्थळी पोहचण्यापूर्वी सियाने केतनच्या फोन मधून चॅट्स, कॉल रेकॉर्ड्स आणि इतर सर्व डेटा डिलिट केला. नंतर तिने तो फोन केतनच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केला. 

इतकचं नव्हे तर घटनेचा तपास सुरु झाल्याच कोणाचा आपल्यावर संशय येऊ नये आणि मोबाईल लोकेशनवरून आपण ट्रॅक होऊ नये या भीतीने चेतनने स्वतःचा फोन त्याच्या घरीच ठेवला होता. तर हत्येचा कट उघड होऊ नये म्हणून सिया आणि चेतन या दोघांनीही आपापसातील अनेक चॅट्स आधीच डिलीट केले होते. दरम्यान फॉरेन्सिक लॅबच्या अहवालातून केतनच्या फोनमधील डिलीट झालेला डेटा रिकव्हर (पुनर्प्राप्त) झाल्यानंतर या हत्येमागचे मुख्य कारण आणि इतर मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. दरम्यान या सर्व बाबींवरून ही हत्या अत्यंत थंड डोक्याने रचलेला एक सुनियोजित कट असल्याचे स्पष्ट होत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version