असंख्य हिंदूंना पूर्वजांच्या अंत्यसंस्काराची जागा माहीत नाही, मात्र मुस्लिम आपल्या पूर्वजांच्या कब्र दाखवू शकतात – जितेंद्र आव्हाड

असंख्य हिंदूंना पूर्वजांच्या अंत्यसंस्काराची जागा माहीत नाही, मात्र मुस्लिम आपल्या पूर्वजांच्या कब्र दाखवू शकतात – जितेंद्र आव्हाड

‘सून ले  सून ले सून ले ,किस की जमीन है यह, दफन जिसके पुरखे उसकी जमीन है यह

अब तू मांगेगा सबुत मेरे देशवासी होनेका, तेरा बाप जब अंग्रेजोंके तलवे चाट रहा था

तब मेरा बाप फासीके फंदे को चुम रहा था उसकी जमीन है यह…’

कवितेने आपल्या भाषणाला सुरुवात करत राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आपल्या भाषणात मोदी सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. ‘या देशातील असंख्य हिंदू नागरीक आपल्या वाडवडिलांचे अंत्यसंस्कार कोठे केले ते सांगू शकत नाहीत. परंतु मुस्लिम आपल्या पूर्वजांच्या कब्र दाखवू शकतात’ असे सांगत, महाराष्ट्रातील पारधी कोल्हाटी समाज आज ही आपले पुरावे दाखवू शकणार नाही असं स्पष्ट केलं.

मोदी सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली असून केरळ, पंजाब प्रमाणेच महाराष्ट्रातही या कायद्याची अंमलबजावणी केली जाणार नाही असा शब्द त्यांनी दिला.

भिवंडीत संविधान बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून कै.परशराम तावरे क्रीडांगण या ठिकाणी मोहम्मद शब्बीर अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जाहीर सभेत व्यासपीठावर डॉ जितेंद्र आव्हाड, योगेंद्र यादव, माजी न्यायमूर्ती बी जे कोळसे पाटील, उमर खालिद, माजी आय पी एस अधिकारी अब्दुल रेहमान, सलामत साबरी, डॉ मोहम्मद कामरान, मुस्तफा फारूक यांसह विद्यार्थिनींची प्रतिनिधी म्हणून निधा सलाम शेख या मुलीस आपले विचार व्यक्त करण्याची संधी दिली.

संविधान बचाव संघर्ष समितीचे निमंत्रक ऍड. किरण चन्ने, विजय कांबळे, फाजील अन्सारी उपस्थित होते. प्रारंभी ऍड किरण चन्ने यांनी सर्व मान्यवरांचे संविधानाची प्रत देऊन सन्मान केला .

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version