जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार

जळगावातील मेहरुण परिसरात पहाटे अपक्ष उमेदवार अहमद हुसेन यांच्या घरावर गोळीबार झाला.
जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार

जळगाव : जळगावातील मेहरुण परिसरात पहाटे अपक्ष उमेदवार अहमद हुसेन यांच्या घरावर गोळीबार झाला. या हल्ल्यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही, जीवितहानी झालेली नाही. अज्ञाताने अहमद हुसेन यांच्या घरावर बंदुकीच्या तीन गोळ्या झाडल्या. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

अहमद हुसेन शेख यांचे मेहरुण परिसरातील शेरा चौकात घर आहे. याच ठिकाणी ही घटना घडली. आठ दिवसापूर्वीच मुक्ताईनगर येथील अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्या गाडीवर देखील अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आला होता.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version