‘मविआत आता आयसिसचा प्रस्ताव येणे बाकी’ – नितेश राणे

‘मविआत आता आयसिसचा प्रस्ताव येणे बाकी’ – नितेश राणे

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचा मविआसोबत हातमिळवणी करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. एमआयएमने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत युतीची तयारी दाखवल्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. यावर, भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत महाविकास आघाडीला चीमटा काढला आहे.

नितेश राणे यांनी ट्विट केले की, ‘वाह…एमआयएमची महाविकास आघाडीमध्ये येण्याची तयारी. कट्टरपंथीना पण शिवसेना आपलीशी वाटालया लागली ईहे. आता फक्त आयसिसचा प्रस्ताव येणे बाकी आहे. खरंच, करून दाखवलं.’

महाविकास आघाडीसोबत हातमिळवणी करण्याची एमआयएमची तयारी असल्याचे समोर आले आहे. तसेच हा निरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापर्यंत पोहचवावा, अशी विनंती एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना केली आहे. तसेच भाजपाला हरवायचे असेल तर एकत्र येणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया इम्तियाज जलील यांनी दिली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी एमआयएमने महाविकास आघाडीसोबत नवी आघाडी करण्याची ऑफर मविआला दिली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version