Gauri palwe death case : गौरी पालवे मृत्यूप्रकरणी पती अनंत गर्जेला अटक; पोलिसांच्या तपासाला वेग

गाौरी पालवे हिचा पती अनंत गर्जेला अटक केली असल्याची माहिती समोर येत आहे.
Gauri palwe death case : गौरी पालवे मृत्यूप्रकरणी पती अनंत गर्जेला अटक; पोलिसांच्या तपासाला वेग

मुंबई : भाजप नेत्या आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे याची पत्नी डॉक्टर गौरी पालवे गर्जे यांनी वरळीतील राहत्या घरात गळफास घेऊन स्वत:ला संपवलं. मात्र, ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप कुटुंबियांकडून केला गेला. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेतली.तर पंकजा मुंडे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली असून पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, असे त्यांनी म्हटले. गौरी गर्जेच्या मृत्यूप्रकरणी तीन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, मध्यरात्री वरळी पोलिसांनी गाौरी पालवे हिचा पती आणि पंकजा मुंडेचा पीए अनंत गर्जेला अटक केली असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, या प्रकरणातील अजून दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली की, नाही याबद्दल माहिती मिळू शकली नाही.

हेही वाचा : लग्नाआधी अफेअर, प्रेयसी गरोदर…पती म्हणून अनंत गर्जेंच नाव; गौरीला सापडली होती ‘ती’ महत्त्वाची कागदपत्र

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version