महाराष्ट्रात चक्रीवादळामुळे मुसळधार पावसाची शक्यता

महाराष्ट्रात चक्रीवादळामुळे मुसळधार पावसाची शक्यता

अरबी समुद्रात दक्षिण-पूर्व भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, त्याचे चक्रीवादळात रूपांतर होणार आहे. येत्या २४ तासांमध्ये या कमी दाबाच्या पट्ट्याचं वादळामध्ये रुपांतर होणार आहे. १५,१६ आणि १७ मे रोजी या वादळाचा प्रभाव दिसेल.

त्यामुळे कोकण किनारपट्टी, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच १६ आणि १७ तारखेला मुंबई, पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यांमध्ये या वादळाचा प्रभाव दिसेल अशी माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

यामुळे देशाच्या दक्षिणेकडील भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. चक्रीवादळात वेगाने होणारी वाढ लक्षात घेता भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version