Assam : आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई! तब्बल 37 किलो वजनाच्या सोन्याच्या विटा जप्त; पोलिसांकडून सांगलीतील आरोपीला अटक

Assam : आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई! तब्बल 37 किलो वजनाच्या सोन्याच्या विटा जप्त; पोलिसांकडून सांगलीतील आरोपीला अटक

आसाम : गुवाहाटी शहर पोलिसांनी खारघुली भागात केलेल्या एका कारवाईदरम्यान 50 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे, तस्करीचे संशयित सोन्याचे बार (विटा) जप्त केले. गुवाहाटीच्या डीसीपी (DCP) शांभवी मिश्रा म्हणाल्या, “आसाम पोलिसांनी जप्त केलेले हे कदाचित आतापर्यंतचे सर्वात मोठे सोन्याचे साठे आहे. जप्त केलेल्या सोन्याचे एकूण वजन सुमारे 37 किलो असून त्याची एकूण किंमत 55 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. आम्हाला सोन्याच्या तस्करीबाबत माहिती मिळाली होती. हे 24 कॅरेट सोन्याचे बार आहेत. त्यासोबतच, सुमारे 13 ग्रॅम वजनाचे चांदीचे काही तुकडे आणि कणही सापडले आहेत. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव अक्षय बनसोडे असे आहे. त्याचे वय 32 वर्षे असून तो महाराष्ट्रातील सांगलीचा रहिवासी आहे. आम्ही या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहोत. 

हेही वाचा : SC On POCSO Act: पीडितेशी लग्न केल्यानंतर मिटला वाद; पोक्सो कायद्यातील दोषीची शिक्षा सुप्रीम कोर्टाकडून रद्द

हे प्रकरण एका मोठ्या आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेटचा भाग असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. याचे धागेदोरे कदाचित मध्य-पूर्वेकडील देश, म्यानमार आणि मुंबई, दिल्ली, कोलकाता व बेंगळुरू यांसारख्या भारतातील प्रमुख शहरांशी जोडलेले असू शकतात. आम्ही या प्रकरणाचा सखोल तपास करत आहोत. आरोपीला विशेषतः या कामासाठीच नेमण्यात आले होते. त्याला दरमहा सुमारे 80 हजार रुपये पगार मिळत होता. यापूर्वी त्याने तीन वेळा प्रत्येकी सुमारे 20 किलो सोन्याची तस्करी केली होती. ही त्याची सोने तस्करीची चौथी वेळ होती.”

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version