राजकीय वर्तुळातून धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्या कुटुंबाची तब्बल 200 तोळे सोन्याची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. सोन्याचे दागिने दुप्पट दागिने दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत एका व्यावसायिकाने सराफाने गंडा घातल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या हायप्रोफाईल फसवणूक प्रकरणी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने राज्याला हदरवलं आहे.
संशयित सराफा व्यावसायिकाने गेल्या दोन वर्षांत माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्या कुटुंबाशी जवळीक साधून पत्नीचे 100 तोळे, मुलीचे 50 तोळे आणि सुनेचे 50 तोळे असे एकूण 200 तोळे सोने ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच सोने दुप्पट करून देण्याच्या नावाखाली दागिने घेतल्यानंतर वेळकाढूपणा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पंचवटी पोलीस या फसवणुकीचा पुढील तपास करत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.