FDA Action Mode : अस्वच्छता…कीटकांचा वावर…आरोग्य नियमांचे उल्लंघन; FDA ची चार हॉटेल्सवर मोठी कारवाई, परवाने निलंबित

FDA Action Mode : अस्वच्छता…कीटकांचा वावर…आरोग्य नियमांचे उल्लंघन; FDA ची चार हॉटेल्सवर मोठी कारवाई, परवाने निलंबित

मुंबई : एफडीने मुंबईतील आणखी 4 हॉटेलचा परवाना निलंबित केला आहे. अस्वच्छता, कीटकांचा वावर आणि आरोग्य नियमांच्या उल्लंघनामुळे FDA ने मोठी कारवाई केली. यामध्ये दादरमधील Eat Nino, अंधेरीतील जय माँ काली ढाबा, सांताक्रूझमधील हाऊस ऑफ महाराष्ट्र आणि कुर्ल्यातील साऊथ इंडियन डोसा कॉर्नरचा समावेश आहे. हॉटेलमध्ये घाण, झुरळे, घरमाशा आणि गंजलेली भांडी आढळल्याने एफडीएने या हॉटेलचा परवना निलंबित करण्याचा निर्णय घेतला. आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे हे एफडीएच्या आयुक्तपदी रुजू झाल्यापासून मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएचे धाडसत्र सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. 

हेही वाचा : Shiv Sena Corporator Resignation : शिवसेनेला धक्का! नवी मुंबईच्या 5 नगरसेवकांचा राजीनामा जिल्हाध्यक्षांकडे सुपूर्द; लवकरच शिंदेंनाही भेटणार

विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचे आढळल्यानंतर एफडीएने आयआयटी बॉम्बे कॅम्पसमधील दोन कँटीनवर कारवाई करत ती तात्काळ बंद केली आहेत. तुकाराम मुंढे आयुक्तपदी नियुक्त झाल्यापासून गुटखा, भेसळ, औषधे आणि हॉटेलमधील अनियमितता तसेच बेकायदेशीर प्रकारांवर एफडीएकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता आयआयटी बॉम्बे कॅम्पसमधील दोन कँटीनवरही एफडीएचा बडगा उगारण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version