राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या मालमत्तेसंदर्भात नाशिकमध्ये ईडीची धाड पडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. व्यावसायिकांचे नवाब मलिक यांच्याशी संबंध असल्याचा ईडीला संशय असल्यामुळे ईडीकडून नाशिकमध्ये व्यावसायिकांची चौकशी करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
नवाब मलिक यांच्याशी संबंधित असलेल्या काही मालमत्तांची चौकशी झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच नाशिकमधील मोठ्या कंपन्यांचे व्यवस्थापकही ईडीच्या रडारवर असल्याची माहिती समोर आली आहे.
ईडीने वकील सतीश उके यांच्या नागरपूरच्या घरी गुरुवारी सकाळी धाड टाकली आहे. सतीश उके हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील आहेत. जमीन व्यवहारप्रकरणी ईडीने त्यांना ताब्यात घेतले आहे. शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या संपत्ती हडपल्याचा आरोप सतीश उके यांच्यावर करण्यात आला आहे. सतीश उकेंच्या घराबाहेर सीआरपीएफ दल तैनात करण्यात आले असून ईडीच्या अधिकाऱ्यांकडून त्यांच्या घराची झाडाझडती सुरू आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.