ईडीकडून सत्येंद्र जैन यांच्यावर अटकेची कारवाई

ईडीकडून सत्येंद्र जैन यांच्यावर अटकेची कारवाई

केजरीवाल सरकारचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना ईडीने अटक केली आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सत्येंद्र जैन यांच्यावर ईडीकडून अटकेची कारवाई करण्यात आली आहे. सत्येंद्र जैन यांच्यावर हवाला व्यवहाराचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी ईडीने आधीपासूनच सत्येंद्र जैन यांची चौकशी केली होती. दरम्यान, ५ एप्रिल रोजी ईडीने जैन यांची ४.८१ कोटी रुपयांची संपत्ती देखील जप्त केली होती.

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर हवाला व्यवहाराचा आरोप आहे. तसेच बनावट कंपन्यांद्वारे आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोपही जैन यांच्यावर  करण्यात आला आहे. तर आयकर विभागाने बेनामी संपत्ती कायद्याच्या आधारे हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले आहे. त्यामुळे सीबीआयकडूनसुद्धा याप्रकरणाची चौकशी सुरू आहे.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोडिया यांनी ट्विट भाजपावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट केले की, ‘सत्येंद्र जैन यांच्याविरोधात गेल्या ८ वर्षांपासून बनावट केस चालवली जात आहे. यापूर्वी अनेकदा ईडीने सत्येंद्र जैन यांना चौकशीसाठी बोलवलं होतं. मात्र, ईडीला चौकशीदरम्यान हाती काही लागले नाही. त्यामुळे त्यांनी चौकशी थांबवली होती. आज पुन्हा त्यांना त्रास देण्यास सुरूवात केली आहे. कारण सत्येंद्र जैन हे हिमाचल निवडणुकीत आपचे निवडणूक प्रभारी आहेत.’

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version