उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत झाली ‘या’ मुद्द्यांवर चर्चा

उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत झाली ‘या’ मुद्द्यांवर चर्चा

साताऱ्यात जिल्हा शासकीय आढावा बैठक आज पार पडली. ही बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा शासकीय विश्रामगृहात पार पडली.

या बैठकीत साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील आणि जिल्हयातील सर्व शासकीय अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत अनेक वर्षापासुन प्रलंबित असणाऱ्या मेडिकल कॉलेज तसेच मर्ढे गावातील बा.सी. मर्ढेकरांचा स्मारकाविषयी चर्चा केली.

अजित पवार यांनी साताऱ्याचे मेडिकल कॉलेज सुरू व्हावं हे माझे स्वप्न आहे. हे मी पुर्ण करणार असल्याचे अजित पवारांनी सांगितलं.

तसंच मर्ढे येथील गेल्या सहा वर्षापासून वर्षे बा.सी. मर्ढेकर यांच्या स्मारकाचे उद्घाटन होत नाही आहे. याप्रकरणी अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली.

तसेच हे काम पालकमंत्र्याचं आहे. त्यांनी हे काम का केलं नाही,असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला.

साताऱ्यात भिलार हे पुस्तकाचं गाव आहे. हे गाव बंद होणार असल्या संदर्भात अजित पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला.

“मी उपमुख्यमंत्री होऊन मला दोन महिने झाले आहेत मात्र पुस्तकांच गाव बंद होणार याबाबत मी प्रथमच ऐकतोय, असं उत्तर अजित पवार यांनी दिलं.

पुस्तकाच्या गावासंदर्भात विस्तार अधिकाऱ्यांनी पत्र दिलय, अशी माहिती असली तरी त्यांना बंद करण्याचे अधिकार कितपत आहे हे माहित नाही.

पण हा प्रकल्प कोणीतरी चालवायला घेउन अधिकारी ठेवावा याविषयी सविस्तर माहिती घेऊन बोलणार असल्याचे अजित पवार म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version