“दिल्लीवालों से डर लगता है, न जाने कब नया कानून लेकर चले आते है” असं वक्तव्य केलंय कवी, गीतकार गुलज़ार (Gulzar) यांनी… हे वक्तव्य करताना त्यांनी कुणाचंही नाव घेतलं नाही. मात्र त्यांचा इशारा कुणाकडे होता, हे सर्वांच्या लक्षात आलं. एका कार्यक्रमादरम्यान यांनी हे वक्तव्य केलं.
सध्या CAA, NRC, NPR वरून देशात मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू आहेत. विद्यार्थ्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी सरकारचा निषेध केला आहे. यामध्ये आता ज्येष्ठ गीतकार गुलज़ार यांचंही नाव समाविष्ट झालं आहे. तसंच आपल्या भाषणाच्या सुरुवातीला उपस्थितांना ‘दोस्तो’ म्हणत संबोधित केलं. त्यानंतर लगेच “मी तुम्हाला ‘मित्रों’ म्हणून संबोधणार होतो, पण थांबलो” असं म्हणत मोदींचं नाव न घेता टोला लगावला.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade) हे देखील उपस्थित होते. त्यांनीदेखील आपले विचार मांडताना सरकारी धोरणांवर टीका केली. आपली वाटचाल हिंसकतेच्या (Violence) दिशेने सुरू असून आपला देश पाकिस्तान (Pakistan) बनण्याच्या प्रक्रियेत असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला.
CAA आणि NRC हे विषय तज्ज्ञ लोकांचे आहेत. दहशतवादी, गुप्तहेरांपासून ते गरीब आश्रितांपर्यंत अनेक लोक भारतात येतात. त्या सर्वांना एकाच फूटपट्टीने मोजणं योग्य नाही. जे येऊ इच्छितात, त्यांना येऊ द्यावं. त्यातील दहशतवादी कोण हे शोधून काढणं सरकारचं काम आहे. मात्र गरीबांना देशाची नागरिकता नाकारणं अयोग्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.