Crime News : आधी पतीला मारलं, आता तिचंही आयुष्य संपवलं; न्यायासाठी लढणाऱ्या महिलेला भररस्त्यात गोळ्या घातल्या

या प्रकरणाला आणखी गंभीर वळण देणारी बाब म्हणजे, रचना यादव यांच्या पतीचीही काही वर्षांपूर्वी अशाच प्रकारे गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.
Crime News : आधी पतीला मारलं, आता तिचंही आयुष्य संपवलं; न्यायासाठी लढणाऱ्या महिलेला भररस्त्यात गोळ्या घातल्या

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतल्या शालीमार बाग परिसरात शनिवारी भरदिवसा घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी रचना यादव यांच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात रचनाचा जागीच मृत्यू झाला. दिवसाढवळ्या झालेल्या या हत्येमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून, परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे. शालीमार बाग पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.

हेही वाचा: PMC Election 2026 : पुणेकरांसाठी अजितदादांचं 'हमीपत्र', मेट्रोसह बसप्रवास मोफत; विद्यार्थ्यांना डेटा प्लॅनसह फ्री 'टॅब'

या प्रकरणाला आणखी गंभीर वळण देणारी बाब म्हणजे, रचना यादव यांच्या पतीचीही काही वर्षांपूर्वी अशाच प्रकारे गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्या प्रकरणात रचना यांनी हार न मानता न्यायासाठी दीर्घकाळ लढा दिला होता. पतीच्या हत्येप्रकरणी त्या थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचल्या होत्या, अशी माहिती समोर आली आहे.

पतीच्या हत्येतील काही आरोपी अद्याप फरार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही हत्या जुन्या वैरातून किंवा साक्षीदाराला गप्प करण्याच्या उद्देशाने करण्यात आली असण्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे. दोन्ही हत्यांमधील संबंध तपासण्यावर तपास यंत्रणांचा भर आहे.

सध्या पोलिसांनी सर्व शक्यता गृहीत धरून तपास सुरू केला असून, आरोपी लवकरच जाळ्यात अडकतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. भरदिवसा झालेल्या या हत्येमुळे दिल्लीतील कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

हेही वाचा: Venezuelan Oil for India : व्हेनेझुएलाचे तेल भारताला मिळणार? ट्रम्प प्रशासनाचे हिरवे कंदील; पण या अटी..

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version