Cockroach Janta Party Manifesto:’पक्ष बदलला तर 20 वर्षाची बंदी, वैध मतं वगळल्यास कारवाई आणि…’, जाणून घ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या जाहीरनाम्यात

'कॉक्रोच जनता पार्टी' नावाची एक डिजिटल चळवळ सुरू झाली, जिने मीम्स, उपहास आणि राजकीय संताप यांचा मेळ घालून सोशल मीडियावर झपाट्याने लोकप्रियता मिळवली.
Cockroach Janta Party Manifesto:’पक्ष बदलला तर 20 वर्षाची बंदी, वैध मतं वगळल्यास कारवाई आणि…’, जाणून घ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या जाहीरनाम्यात

आजकाल सोशल मीडियावर एक नाव झपाट्याने ट्रेंड होत आहे: 'कॉक्रोच जनता पार्टी'. मीम्स, राजकीय चर्चा आणि तरुणांच्या संतापाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेली ही ऑनलाइन मोहीम आता इंटरनेटवर एक मोठा ट्रेंड बनली आहे. अवघ्या काही दिवसांत हजारो लोक यात सामील झाले आहेत. पण हा पक्ष नेमका काय आहे, त्याची स्थापना कोणी केली आणि लोक त्यात इतका रस का दाखवत आहेत? याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. 

कॉक्रोच जनता पार्टी हा एक ऑनलाइन राजकीय व्यंग गट आहे, जो सर्वसामान्य लोकांचा, विशेषतः तरुणांचा, व्यवस्थेबद्दलचा राग आणि निराशा व्यक्त करण्यासाठी तयार करण्यात आला आहे असे म्हटले जाते. त्याची टॅगलाइन आहे – "आळशी आणि बेरोजगारांचा आवाज".

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या एका वक्तव्यावरून सोशल मीडियावर वाद निर्माण झाल्यावर हा ट्रेंड सुरू झाला. यानंतर, अनेक इंटरनेट वापरकर्त्यांनी तरुण, बेरोजगारी आणि व्यवस्थेबद्दल आपला संताप व्यक्त केला. या वातावरणात 'कॉक्रोच जनता पार्टी' नावाची एक डिजिटल चळवळ सुरू झाली, जिने मीम्स, उपहास आणि राजकीय संताप यांचा मेळ घालून सोशल मीडियावर झपाट्याने लोकप्रियता मिळवली.

दरम्याने या पक्षाना जाहीरनामादेखील प्रसिद्ध केला आहे. जाणून घेऊया. पक्षाचा जाहीरनामा काय आहे?

– मंत्रिमंडळात महिलांसाठी 50 टक्के आरक्षण

– पक्ष बदलणाऱ्या खासदार आणि आमदारांवर 20 वर्षांची निवडणूक बंदी

– निवृत्तीनंतर सरन्यायाधीशांना राज्यसभा पदे न देण्याची मागणी

-निवडणुकांमध्ये वैध मते वगळल्यास कारवाई

– याशिवाय, पक्षाने नीट (NEET) वादात सामील असलेल्या विद्यार्थ्यांनाही पाठिंबा दिला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version