भाजपकडून राज्यसभेच्या उमेदवारांची नावं जाहीर, महाराष्ट्रातून या ‘दोघांना’ उमेदवारी

भाजपकडून राज्यसभेच्या उमेदवारांची नावं जाहीर,  महाराष्ट्रातून या ‘दोघांना’ उमेदवारी

भाजपकडून राज्यसभासाठीच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची नाव जाहीर करण्यात आली आहे. भाजपकडून एकूण ७ उमेदवारांची नाव जाहीर करण्यात आली आहे. तर सहयोगी पक्षाच्या २ उमेदवारांची नाव जाहीर करण्यात आली आहेत.

मध्य प्रदेशमधून ज्योतिरादित्य सिंधीया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ज्योतिरादित्य सिंधीया यांनी आज जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपात प्रेवश केला. तसेच विविध राज्यातून अनेक उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातून २ जणांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये भाजपचे उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

महाविकासआघाडीकडून एकूण ४ उमेदवार राज्यसभा निवडणुका लढवणार आहेत. यामध्ये २ जागा या राष्ट्रवादीच्या हिश्याला आल्या आहेत. शरद पवार आणि फौजिया खान यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

एकूण १७ राज्यातील ५५ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने याबद्दलची माहिती दिली आहे. ही द्विवार्षिक निवडणुकीसाठी २६ मार्चला निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.

शरद पवार यांनी बुधवारी विधानभवनात अर्ज दाखल केला आहे.

राज्यसभेसाठी शरद पवार यांनी दाखल केला अर्ज

महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेलेल्या ७ खासदारांची मुदत काही दिवसांमध्ये संपत आहे. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुका घेण्यात येत आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी रामदास आठवले आणि उदयनराजे भोसले गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची १३ मार्च ही शेवटची तारीख असणार आहे. तर १८ मार्च ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असेल.

राज्यसभेच्या एकूण ५५ जागांसाठी २६ मार्चला होणार निवडणूक

राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. तसेच राज्यसभेवर महाराष्ट्रातले एकूण १९ खासदार दिल्लीत नेतृत्व करतात.

राज्यसभा सभागृह कधीच विसर्जित होत नाही. राज्यसभेची एकूण २५० इतकी सदस्यसंख्या असते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version