Beed Crime : बीड हादरलं! ऊसतोड मजुराच्या दोन चिमुकलींवर अत्याचार

Beed Crime : बीड हादरलं! ऊसतोड मजुराच्या दोन चिमुकलींवर अत्याचार

बीड : बीड जिल्ह्यात दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात हा संतापजनक प्रकार घडला असून त्यामुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या गावात ऊस तोडीसाठी छत्तीसगड राज्यातून आलेल्या मजुराच्या दोन अल्पवयीन मुलींवर गावातील दोन व्यक्तींनी अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. 

हेही वाचा : Honey Trap : एका पार्सलने केला घात!; 16 सैनिकांना हनी ट्रॅपमध्ये अडकवणाऱ्या महिलेचे पाकिस्तानी कनेक्शन उघड

मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगड येथून ऊस तोडीसाठी आलेले एक कुटुंब माजलगाव तालुक्यात राहत होते. या कुटुंबातील दोन अल्पवयीन मुली ऊसतोडीच्या कामासाठी आई-वडिलांसोबत आल्या होत्या. गेल्या आठवड्यातील बुधवारी, 24 डिसेंबर रोजी या दोन्ही मुली एकट्या असताना गावातील गणेश घाटूळ आणि अशोक पवार या दोघांनी त्यांच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतर काही दिवसांनी यातील एका मुलीला त्रास जाणवू लागल्याने तिने घडलेला प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. त्यांनी तत्काळ माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात जात तक्रार दाखल केली. पोलिसांनीही तात्काळ कारवाई करत आरोपी गणेश घाटूळ व अशोक पवार यांना अटक केली. याप्रकरणी भारतीय दंड संहिता तसेच पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, दोन्ही अल्पवयीन मुलींना सुरक्षिततेच्या दृष्टीने महिला व बालकल्याण समितीच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांचे समुपदेशन आणि वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. तसेच या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version