Bus Accident: भयंकर! 40 प्रवाशांना घेऊन जाणारी बस नदीत बुडाली, दुर्घटनेत 23 जणांचा मृत्यू तर अनेक जण बेपत्ता

बचाव पथकांनी शोधमोहीम सुरू ठेवली असून काही प्रवासी अद्याप बेपत्ता आहेत.
Bus Accident: भयंकर! 40 प्रवाशांना घेऊन जाणारी बस नदीत बुडाली, दुर्घटनेत 23 जणांचा मृत्यू तर अनेक जण बेपत्ता

बांगलादेशमध्ये काल बुधवारी 25 मार्च 2026 रोजी सायंकाळी भीषण अपघात घडून अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सुमारे 40 प्रवाशांना घेऊन जाणारी एक बस पद्मा नदीत कोसळल्याने किमान 23 जणांचा मृत्यू झाला आहे. या बसमध्ये काही लहान मुलांचाही समावेश होता. प्राथमिक माहितीनुसार, प्रवासी ईदच्या सुट्ट्या साजऱ्या करून राजधानी ढाकाकडे परतत असताना हा दुर्दैवी अपघात घडला.

हा अपघात दक्षिण-पश्चिम बांग्लादेशातील राजबारी जिल्ह्यातील दौलाडिया टर्मिनल परिसरात सायंकाळी सुमारे पाच वाजता घडला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, बस नदी पार करण्यासाठी फेरीवर चढण्याचा प्रयत्न करत होती. त्याच वेळी एका छोट्या बोटीशी बसची धडक झाली आणि चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट पद्मा नदीच्या खोल पाण्यात कोसळली.

हेही वाचा: Aaditya Thackeray : कॉफीवरून टोलेबाजी! नितेश राणेंनी डिवचल्यानंतर आदित्य ठाकरेंनी 'करून दाखवलं'

बस नदीत पडताच परिसरात एकच गोंधळ उडाला. प्रवाशांच्या आर्त किंकाळ्यांनी वातावरण गंभीर झाले होते. स्थानिक लोकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले, तर काही वेळातच सेना, पोलीस, अग्निशमन दल आणि तटरक्षक दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. अनेक प्रवाशांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असतानाच मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हवामान प्रतिकूल असल्यामुळे बचावकार्य मोठ्या अडचणींच्या परिस्थितीत सुरू ठेवावे लागले. मोठ्या क्रेनच्या मदतीने नदीत बुडालेली बस बाहेर काढण्यासाठी जवळपास सहा तासांचा कालावधी लागला. बचाव पथक नदीत शोधमोहीम राबवत असून काही प्रवासी अजूनही बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, मृतांच्या पार्थिवांना नदीतून बाहेर काढून पुढील प्रक्रियेसाठी पाठवण्यात येत आहे. प्रशासनाने या अपघाताची चौकशी सुरू केली असून नेमके कारण काय होते याचा तपास केला जात आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

हेही वाचा: Pune New Route Changes : पुणेकरांनो आज बाहेर पडताय? रामनवमीनिमित्त या प्रमुख मार्गावरील वाहतूक राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version