पुणे रेल्वे स्टेशनला उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. पुणे रेल्वे स्टेशनवर डॉग स्कॉड, बॉम्ब शोध पथक, पोलीस यांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस आसपास होणाऱ्या सर्व घडामोडींवर लक्ष ठेऊन आहेत. रेल्वे स्थानकावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. प्रवाश्यांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुणे पोलिसांनी रेल्वे स्टेशनला आलेल्या निनावी फोन संदर्भात तपास सुरू केला आहे. हा फोन कॉल मनमाड परिसरातून करण्यात आला होता अशी माहिती होती. पोलिसांनी फोन करणाऱ्याला अटक करण्यासाठी मनमाडच्या दिशेने धाव घेतली.
काही तासांमध्येच पुणे पोलिसांनी या प्रकरणामध्ये मनमाडमधून एका तरुणाला अटक केली. या तरुणाचं नाव गोविंद मांडे असं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.तर हा मूळचा परभणीचा आहे. मागील १ महिन्यापासून कात्रज येथे वॉचमनची नोकरी करत होता. तर त्याने गाडी मनमाड स्टेशन येथे जास्त वेळ थांबली. आणि बोगीमध्ये एका पॅसेंजरशी वाद झाला होता. त्यामुळे तो राग मनात धरून होक्सकॉल केला आहे. या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
हा कॉल त्याने मनमाड स्थानकातून केला होता. कॉल चालू असतानाच या दोन इसमांनी गोविंदच्या हातून फोन खेचून घेत, “आम्हाला दहशतवादी हल्ल्यांचे काम करायचे असते आता आम्ही १४२ किलोमीटर ते १५० किलोमीटर या ठिकाणी काम करणार आहोत,” असं म्हटलं. हे सारं संभाषण नियंत्रण कक्षामध्ये रेकॉर्ड झालं आणि पोलिस सक्रीय झाले. त्यांनी तातडीने मनमाडला जाऊन गोविंदला ताब्यात घेऊन चौकशी केली असता हा सारा प्रकार समोर आला. हा कॉल गैरसमजुतीत झाला असावा असे प्राथमिक तपासात समोर आलं असलं तरी पोलिसांनी सध्या गोविंदला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी करणार आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.