Apple CEO Tim Cook : एका वर्षात इतका पैसा; अ‍ॅपलच्या सीईओंचा पगार ऐकून व्हाल थक्क, SEC च्या फायलिंगमधील आकडेवारी समोर

या अहवालातून Apple च्या व्यवसायाशी संबंधित महत्त्वाची माहिती समोर आली असून, कंपनीच्या टॉप एग्झिक्युटिव्ह्सना मिळालेल्या पगार आणि बोनसचे तपशीलही जाहीर झाले आहेत.
Apple CEO Tim Cook : एका वर्षात इतका पैसा; अ‍ॅपलच्या सीईओंचा पगार ऐकून व्हाल थक्क, SEC च्या फायलिंगमधील आकडेवारी समोर

जगप्रसिद्ध टेक कंपनी Apple ने वर्ष 2025 साठीची आपले Annual Proxy Filing अमेरिकेच्या Securities and Exchange Commission (SEC) कडे सादर केली आहे. हे फाइलिंग प्रत्येक सार्वजनिक कंपनीसाठी अनिवार्य असते. या अहवालातून Apple च्या व्यवसायाशी संबंधित महत्त्वाची माहिती समोर आली असून, कंपनीच्या टॉप एग्झिक्युटिव्ह्सना मिळालेल्या पगार आणि बोनसचे तपशीलही जाहीर झाले आहेत.

या फाइलिंगनुसार Apple चे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कुक यांना 2025 मध्ये एकूण 74.3 मिलियन डॉलरचे पॅकेज मिळाले आहे. भारतीय चलनात पाहता ही रक्कम सुमारे 668 कोटी रुपये इतकी होते. विशेष म्हणजे, 2024 च्या तुलनेत ही कमाई थोडीशी कमी आहे. मागील वर्षी टीम कुक यांना सुमारे 74.6 मिलियन डॉलर मिळाले होते. कंपनीने 2025 साठी त्यांचा टार्गेट पॅकेज 59 मिलियन डॉलर निश्चित केले होते, मात्र Apple च्या मजबूत कामगिरीमुळे मिळालेल्या बोनस आणि इन्सेंटिव्हमुळे त्यांची कमाई या लक्ष्याच्या बरीच पुढे गेली.

टीम कुक यांच्या 2025 च्या पॅकेजमध्ये विविध घटकांचा समावेश आहे. त्यांची बेस सॅलरी तीन मिलियन डॉलर इतकीच असून ती 2016 पासून बदललेली नाही. याशिवाय, 57.5 मिलियन डॉलरचे स्टॉक अवॉर्ड्स त्यांना मिळाले, जे त्यांच्या एकूण पॅकेजमधील सर्वात मोठा हिस्सा आहे. नॉन-इक्विटी इन्सेंटिव्ह प्लॅनअंतर्गत त्यांना 12 मिलियन डॉलर मिळाले, तर सुमारे 1.7 मिलियन डॉलर इतर सुविधांसाठी देण्यात आले आहेत. यामध्ये सुरक्षा खर्च आणि कंपनीच्या प्रायव्हेट जेटचा (Private Jet) वापर यांचा समावेश आहे.

हेही वाचा: BMC Election 2026 : शिंदे गटाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपची 'त्या' 12 नगरसेवकांवर झडप

दरम्यान, Apple मध्ये लीडरशिप बदलांची चर्चाही जोर धरत आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, टीम कुक यांनी वरिष्ठ नेतृत्वाला आपले कामाचे ओझे कमी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भविष्यात ते Apple च्या बोर्डचे चेअरमन (Chairman) पद स्वीकारू शकतात, अशीही चर्चा आहे. तसेच, कंपनीचे हेड ऑफ इंजिनिअरिंग John Ternus हे पुढील CEO पदासाठी आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे, मात्र याबाबत Apple कडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

या अहवालात Apple मधील भारतीय वंशाच्या दोन टॉप एग्झिक्युटिव्ह्सची कमाईही समोर आली आहे. Apple चे चीफ फायनान्शियल ऑफिसर केव्हन पारेख आणि जुलै 2025 मध्ये चीफ ऑपरेटिंग ऑफिसर पदावर नियुक्त झालेले सबिह खान यांना कोट्यवधींचे पॅकेज मिळाले आहे. सबिह खान यांना 2025 मध्ये एकूण 27 मिलियन डॉलर (सुमारे 243 कोटी रुपये) मिळाले असून, यात एक मिलियन डॉलर बेस सॅलरी आणि 22 मिलियन डॉलरचे स्टॉक अवॉर्ड्स आहेत.

तर केव्हन पारेख यांना 22.4 मिलियन डॉलरचे पॅकेज मिळाले, जे भारतीय चलनात सुमारे 201 कोटी रुपये होते. त्यांची बेस सॅलरी सुमारे 8.9 लाख डॉलर असून, 18.4 मिलियन डॉलर स्टॉक्सच्या स्वरूपात देण्यात आले आहेत. या आकड्यांवरून Apple मधील टॉप लेव्हल मॅनेजमेंटला कंपनीकडून किती मोठ्या प्रमाणात आर्थिक मोबदला दिला जातो, हे स्पष्टपणे दिसून येते.

हेही वाचा: Tata Steel Chess Tournament : आर. प्रागननंदा आणि वेस्ली सो यांच्या सामन्यात मोठा वाद; 1 सेकंद बाकी असताना घड्याळ थांबवले.. आणि..

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version