राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केली. अनिल देशमुख यांची १३ तासांच्या चौकशीनंतर त्यांना ६ नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली होती. त्यामुळे आज त्यांची न्यायालयीन कोठडी संपली असून त्यांना आज पुन्हा न्यायालयात हजर रहावे लागले. आणि दरम्यान त्यांच्या कोठडीत वाढ झाली असून त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अनिल देशमुखांची रवानगी आर्थर रोड कारागृहात होणार आहे.
आज अनिल देशमुख न्यायालयात हजर राहणार होते. त्यामुळे अनिल देशमुख यांना आज जेल की बेल? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. आणि पीएमएलए न्यायालयाने त्याच्या कोठडीत वाढ केली असून येत्या १९ नोव्हेंबर पर्यंत १४ दिवासांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुली प्रकरणी अनेक आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणी ईडीने देशमुखांना समन्ससुद्धा बजावले होते. मात्र देशमुख ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले नाही. आपल्यावरील कारवाई रद्द करण्यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. आणि अखेर इतके दिवस बेपत्ता असलेले अनिल देशमुख न्यायलयात हजर झाले होते. त्यावेळी त्यांची १३ तास चौकशी केल्यानंतर ६ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आणि आज पुन्हा अनिल देशमुख यांच्यावर सुनावणी झाली असून पीएमएलए न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.