नाना पटोलेंविरोधात अनिल बोंडेंचे वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले…

नाना पटोलेंविरोधात अनिल बोंडेंचे वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले…

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे पंतप्रधानांविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. नाना पटोलेंविरोधात विरोधक आक्रमक झाले असून राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. भाजप आमदार अनिल बोंडे यांनी नाना पटोलेविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले. नाना पटोलेंनी आपली बोटे सांभाळून ठेवावीत. शाहिस्तखानाची फ्क बोटे छाटली होती, तुमचा तर पुर्ण पंजा छाटला जाईल, अशी टीका अनिल बोंडे यांनी केली आहे.

भाजप आमदार अनिल बोंडे यांनी नाना पटोलेंवर टीका केली आहे. ते म्हणाले, काँग्रेस नेत्यांमध्ये कुत्र्यासारखी भुकांयची शर्यत लागली आहे. सोनिया गांधींना खुष करण्यासाठी नानांनी पंतप्रधानांवर टीका केली. मालकिणीला खुष करण्यासाठी भुंकण्यासह मोदींना चावण्याचीही धमकी त्यांनी दिली आहे. नाना पटोले मालकिणीचे प्रामाणिक कुत्रा आहे,  अशी टीका अनिल बोंडे यांनी केली आहे. तसेच नाना पटोले यांनी आपला पंजा सांभाळून ठेवावा, असा इशाराही अनिल बोंडे यांनी नाना पटोले यांना दिला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version