छत्रपती संभाजी नगर येथील आमदार संजय शिरसाट यांनी दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या उपनेते सुषमा अंधारे यांच्यांवर अर्वाच्च भाषेत टिका केली होती. यावरु आता राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुषमा अंधारे यांनी संजय शिरसाटांविरोधात मोहिम उघडली आहे. संजय शिरसाटांनी केलेल्या वक्तव्याविरोधत सुषमा अंधारेंनी महिला आयोगात धाव घेतली आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या, “संजय शिरसाट या विकृत आमदाराने वापरलेली भाषा ही व्यक्तीशः मलाच नाही तर एकूणच महिला वर्गाच्या मनात लज्जा उत्पन्न करणारी बहीण भावाच्या पवित्र नात्याला कलंक लावणारी भाषा आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल न करून घेतल्याने मी महिला आयोगाकडे तक्रार केली आहे.” असे ट्विट त्यांनी केले आहे.
२६ मार्च २०२३ रोजी छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आयोजित एका बैठकीमध्ये संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्या बाबतीत अर्वाच्य भाषेत आणि खालच्या पातळीवर जाऊन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वक्तव्य केल्यामुळे त्यांच्या विरोधात अंधारे यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे रीतसर तक्रार अर्ज दाखल केल्याची माहिती आहे.
काय म्हणाले होते शिरसाट…
‘ती बाई सर्वांना म्हणते माझे भाऊ आहेत. काय काय लफडे केले तिने काय माहीत, असं धक्कादायक विधान त्यांनी केलं होतं. अंबादास दानवे यांनी मला फोन केला होता. म्हणाले, ती बाई डोक्याच्यावर झाली आहे, असा गौप्यस्फोटही शिरसाट यांनी केला. कोणीही आजकाल सोशल मीडियावर कॉमेट करतं. आम्हाला गद्दार, गद्दार म्हणतंय,अरे घरात बघ काय चाललंय. मग आमच्यावर टीका कर, असा वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं होते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.