Mumbai Kala Chowki Ganpati : दुःखद! मुंबईच्या काळाचौकी परिसरात विजेचा शॉक लागून 8 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू; तर 5 जण जखमी

Mumbai Kala Chowki Ganpati : दुःखद! मुंबईच्या काळाचौकी परिसरात विजेचा शॉक लागून 8 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू; तर 5 जण जखमी

मुंबई : मुंबईतील लालबाग भागात रविवारी पहाटे एका गणपती मंडपाजवळ विजेचा धक्का लागल्याच्या घटनेत आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच या घटनेत अनेकजण जखमी झाले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही घटना काळाचौकी येथील दत्ताराम लाड मार्गावरील 'कालाचौकी विभाग सार्वजनिक उत्सव मंडळा'जवळ पहाटे 2.20 च्या सुमारास घडली. त्यावेळी गणपती उत्सवामुळे लालबाग परिसरात मोठी गर्दी होती. मुंबई अग्निशमन दलाला (MFB) पहाटे 2.42 वाजता या घटनेची माहिती मिळाली, त्यानंतर अग्निशमन दल, पोलीस, बेस्ट (BEST) आणि महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले, असे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा : Special Train : रेल्वेचा मोठा निर्णय! दिवाळी-छठपूजेसाठी स्पेशल ट्रेन धावणार, कधी आणि कुठून किती वाजता सुटणार?

घटनास्थळी उपस्थित पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाच जखमींना भायखळा येथील मसिना रुग्णालयात नेण्यात आले. तर इतरांना परळ येथील ग्लोबल रुग्णालयात हलवण्यात आले. मसिना रुग्णालयात आठ वर्षांच्या रागिणी घनश्याम यादव हिला मृत घोषित करण्यात आले. किरण अकबर नाईक (19), तन्वी नर्श हांडे (19), साहिल संदीप तरे (19) आणि रुही सिंग (12) यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version