Amravati Crime: अमरावतीत निलंबित तलाठ्याच्या घरावर रात्री गोळीबार; दोन गोळ्या भिंतीवर आदळल्या, कुटुंबीय…

अमरावतीत निलंबित तलाठी विपुल ठाकरे यांच्या घरावर अज्ञातांनी दोन गोळ्या झाडल्या. गोळ्या भिंतीला लागल्या असून कुटुंबीय घरात होते.
Amravati Crime: अमरावतीत निलंबित तलाठ्याच्या घरावर रात्री गोळीबार; दोन गोळ्या भिंतीवर आदळल्या, कुटुंबीय…

अमरावती शहरातील अर्जुन नगर परिसरात निलंबित तलाठी विपुल ठाकरे यांच्या घरावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना रविवारी रात्री घडली. घरावर दोन गोळ्या झाडण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. गोळीबाराच्या वेळी ठाकरे यांच्या कुटुंबातील सदस्य घरात उपस्थित होते.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री अज्ञात व्यक्ती अर्जुन नगरमधील विपुल ठाकरे यांच्या घराजवळ आले. घराच्या प्रवेशद्वाराच्या दिशेने त्यांनी गोळीबार केला आणि त्यानंतर घटनास्थळावरून पसार झाले. प्राथमिक तपासात दोन गोळ्या घराच्या भिंतीला लागल्याचे समोर आले आहे. गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि गाडगेनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाला सुरुवात केली आहे.

विपुल ठाकरे यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा

दरम्यान, विपुल ठाकरे यांच्याविरोधात एका महिलेच्या तक्रारीवरून अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात ठाकरे सध्या फरार असल्याची नोंद पोलिसांकडे आहे. त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू असतानाच त्यांच्या घरावर गोळीबार झाल्याने या घटनेला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. गोळीबारामागे नेमके कारण काय, हल्लेखोर कोण होते आणि या घटनेचा ठाकरे यांच्याविरोधातील दाखल गुन्ह्याशी काही संबंध आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version