एमआयएमकडूनही अदनान सामीला दिलेल्या पद्मश्री पुरस्काराला विरोध

एमआयएमकडूनही अदनान सामीला दिलेल्या पद्मश्री पुरस्काराला विरोध

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये मूळचा पाकिस्तानी असलेल्या अदनान सामी याला देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला.

अदनान सामीला देण्यात आलेल्या पद्मश्री पुरस्काराविरोधात मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने विरोध केला. यानंतर आता एमआयएमकडूनही अदनान सामीला जाहीर झालेल्या पद्मश्री पुरस्काराचा विरोध करण्यात आला आहे.

काय म्हणाले इम्तियाज जलील ?

अदनान सामीला दिलेल्या पद्मश्री पुरस्कारचा आम्ही विरोध करतो. भारतीय नागरिकांरकडून त्यांचं नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी दाखले मागितले जात आहेत. पण अदनान सामीला भारताचं नागरिक्तव दिलं जातं. आणि पद्मश्री जाहीर केला जातो, हा काय प्रकार आहे ? असा सवाल देखील  जलील यांनी केला.   

गायक अदनान सामी मूळचा पाकिस्तानचा आहे. त्याला काही वर्षांआधी मागणी केल्यानंतर भारतीय नागरिक्तव बहाल करण्यात आले आहे.

दरम्यान अदनान सामीला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मनसेच्या वतीने अमेय खोपकर यांनी पुरस्काराला विरोध केला. यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडूनही विरोध करण्यात आला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version