रेडी-टू-ईट ‘डोसा’ने घेतला दोन चिमुरड्यांचा जीव? आई-वडीलही मृत्यूच्या दारात, सत्य समोर

या घटनेमुळे अन्नसुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून प्रशासनाने तपास सुरू केला आहे.
रेडी-टू-ईट ‘डोसा’ने घेतला दोन चिमुरड्यांचा जीव? आई-वडीलही मृत्यूच्या दारात, सत्य समोर

गुजरातमधील अहमदाबाद शहरातील चांदखेड़ा परिसरातून समोर आलेल्या एका धक्कादायक घटनेने अन्नसुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. बाजारातून आणलेल्या रेडी-टू-ईट डोसा पॅकेटमुळे एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, अवघ्या तीन महिन्यांच्या आणि साडेतीन वर्षांच्या दोन सख्ख्या बहिणींचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि शोककळा पसरली आहे.

ही घटना 1 एप्रिल 2026 रोजी घडली. कुटुंबाने चांदखेड़ा येथील घनश्याम डेअरी येथून डोसा बनवण्यासाठी पाकीट खरेदी केले होते. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, त्यापासून बनवलेला डोसा खाल्ल्यानंतर घरातील वडिलांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. सुरुवातीला याचा अन्नाशी संबंध असल्याचा संशय कुणालाही आला नव्हता.

यानंतर दुसऱ्या दिवशी आई आणि साडेतीन वर्षांची मोठी मुलगी यांनीही तोच डोसा खाल्ला. आईच्या दुधावर अवलंबून असलेल्या तीन महिन्यांच्या बाळालाही याचा परिणाम झाला. काही वेळातच आईसह दोन्ही मुलींची प्रकृती झपाट्याने खालावली. उपचारादरम्यान लहान बाळाचा मृत्यू झाला, तर मोठ्या मुलीनेही दुसऱ्याच दिवशी प्राण गमावले. या दुर्दैवी घटनेने परिसर हादरून गेला आहे.

हेही वाचा: Arjun Tendulkar Carrying Drinks : मास्टरब्लास्टरचा मुलगा शेवटी मेहनतच निवडणार; अर्जूनच्या 'त्या' कृतीने जिंकली अनेकांची मनं

घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि आरोग्य विभाग तात्काळ सक्रिय झाले. फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या पथकाने संबंधित डेअरीवर छापा टाकून अन्नपदार्थांचे नमुने जप्त केले आहेत. डोसा पॅकेटसह इतर वस्तूंची तपासणी सुरू असून, अंतिम अहवालाची प्रतीक्षा आहे.

दरम्यान, डेअरी व्यवस्थापनाने सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांनी सांगितले की, “आम्ही दररोज 100 किलोहून अधिक पॅकेट विकतो, मात्र अशी घटना फक्त याच कुटुंबासोबत घडली आहे. आमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज आणि ग्राहकांचे अभिप्राय आहेत, ज्यात कुठलीही तक्रार आढळलेली नाही.”

या प्रकरणाचा तपास पोलीस आणि अहमदाबाद महानगरपालिका करत आहेत. अंतिम अहवालातूनच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे, हे अन्न विषबाधेमुळे झाले की साठवण प्रक्रियेत काही गंभीर त्रुटी होती, हे लवकरच समोर येईल.

ही घटना बाजारातून खुलेपणाने विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा करते. एका क्षुल्लक दुर्लक्षामुळे दोन निरागस जीव गमवावे लागले, ही बाब प्रत्येक नागरिकासाठी आणि विशेषतः पालकांसाठी मोठी इशारा देणारी ठरली आहे.

हेही वाचा: Mahabhulekh New Portal: तहसील कार्यालयात हेलपाटे घालायची गरज नाही; 'महाभूलेख' पोर्टल पुन्हा सुरू; आता एका क्लिकवर घरबसल्या मिळवा सातबारा आणि फेरफार नोंदी

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version