Income Tax on Sonu Sood : कोरोना काळात मदत केली पण…; अभिनेता सोनू सूद आयकर विभागाच्या रडारवर

सोनू सूद यांच्या फाउंडेशनवर आयकर विभागाने औपचारिक चौकशी सुरू केली आहे. 18 कोटी 94 लाख रुपयांच्या देणगी निधीपैकी अल्प खर्च झाल्याचा प्राथमिक अहवालानंतर ही चौकशी हाती घेण्यात आली.<br/>
Income Tax on Sonu Sood : कोरोना काळात मदत केली पण…; अभिनेता सोनू सूद आयकर विभागाच्या रडारवर

मुंबई : कोरोना काळात गरजू लोकांना मदत करून "रिअल हिरो" म्हणून ओळखला गेलेला अभिनेता सोनू सूद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एप्रिल 2021 मध्ये त्याच्या फाउंडेशनमार्फत सुमारे 18 कोटी 94 लाख रुपयांचा देणगी निधी जमा झाल्याचे समोर आले होते. या पैकी केवळ 1 कोटी 90 लाख रुपये खर्च झाले, असा प्राथमिक अहवाल सांगतो. त्यामुळे उर्वरित निधीचा वापर नेमका कसा झाला, याबाबत आयकर विभागाने आता चौकशी सुरू केली आहे.

शनिवारीपासून अधिकृत चौकशी प्रक्रियेची सुरुवात झाली असून, फाउंडेशनच्या आर्थिक व्यवहारांवर विशेष लक्ष केंद्रीत केले जात आहे. या चौकशीत एकूण 11 बँक खाते आणि लॉकर सील करण्यात आले आहेत. याशिवाय 1 कोटी 80 लाख रुपयांची रक्कम जप्त झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. या कारवाईमुळे सोनू सूद आणि त्याच्या फाउंडेशनवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

हेही वाचा – Raj Thackeray and Uddhav Thackeray: तुमचा बेपारी ब्रँड संपणार पण आमचा मराठी ठाकरे विचार…, मनसेच्या संदीप देशपांडेंचा भाजपाला टोला 

कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत सोनू सूदने हजारो स्थलांतरित कामगार, विद्यार्थी, तसेच गरजू नागरिकांना मदत केली होती. रेल्वे, बसेस, वैद्यकीय मदत, औषधे आणि ऑक्सिजन सिलिंडर पुरवण्यापासून ते रोजगार उपलब्ध करून देण्यापर्यंत अनेक उपक्रम त्याने हाती घेतले होते. त्यामुळे त्याचे कार्य देशभरातून कौतुकास्पद ठरले होते आणि लाखो लोकांनी त्याला "जनतेचा हिरो" म्हणून गौरवले होते.

हेही वाचा –Asia Cup 2025 : भारत-पाक सामना आणि संजय राऊतांची केंद्र-बीसीसीआयवर टीका 

मात्र, आता फाउंडेशनच्या खर्च, हिशेब आणि नियमांचे पालन या बाबींवर शंका उपस्थित झाली आहे. विशेषतः परदेशातून आलेल्या निधीवरील एफडीआय नियमांचे पालन झाले आहे का, यावरही आयकर विभागाचा भर आहे. अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार, या चौकशीचे तपशील पुढील काही दिवसांत समोर येण्याची शक्यता असून, त्यावरून सोनू सूदच्या फाउंडेशनच्या कार्यपद्धतीबाबत महत्त्वाची माहिती मिळू शकते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version