मीरा-रोड हत्येप्रकरणी कारवाई

मीरा-रोड हत्येप्रकरणी कारवाई

मुंबई, ८ जून,२०२३, प्रतिनिधी :

मीरा-रोड हत्येप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. आरोपी मनोज सानेला १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मनोज साने याने गुरुवारी ( ८ जून ) ठाणे न्यायालयात हजेरी लावली होती. मीरा रोड हत्याकांड प्रकरणात आरोपी मनोज साने याला नया नगर पोलिसांनी ठाण्याकडून न्यायालयात गुरुवारी हजर करण्यात आले. ठाणे न्यायालयाने आरोपी मनोज साने याला १६ जूनपर्यंत सात दिवसीय पोलीस कोठडी सुनावली आहे.

काय आहे प्रकरण ?

मीरारोडमध्ये सरस्वती वैद्य (३२) या तरुणीची तुकडे तुकडे करून हत्या करण्यात आली आहे. तरुणीचा प्रियकर मनोज साने (५६) याने करवतीने मृतदेहाचे तुकडे करून तिची हत्या केली आहे, अशी माहिती समोर येत आहे. तरुणी आणि तिचा साथीदार तीन वर्षांपासून एकत्र नयानगर फेज-७ येथे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते, अशी माहितीही समोर येत आहे. त्यांच्या खोलीतून काही दिवसांपासून दुर्गंधी येत होती. याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घराची पाहणी केली असता सरस्वतीची हत्या झाल्याचे समोर आले. यात तिच्या मृतदेहाचे काही तुकडेही करण्यात आले होते. दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता घरात पायाचे तुकडे होते. अन्य अवयवाची आरोपीने विल्हेवाट लावल्याचे समजते. मनोज आणि सरस्वती यांच्यात सतत भांडणे व्हायची अशी प्राथमिक माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version