Vasai Fish Viral Video : वसईकरांनो, मासे खाताय तर सावधान..! मासळीवर चक्क लाल हिटची फवारणी

वसईच्या नवजीवन परिसरात माशांवर लाल हिट स्प्रे फवारणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर प्रशासनाने तात्काळ कारवाई केली आहे.
Vasai Fish Viral Video : वसईकरांनो, मासे खाताय तर सावधान..! मासळीवर चक्क लाल हिटची फवारणी

वसईच्या नवजीवन परिसरात माशांवर लाल हिट स्प्रे फवारणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर प्रशासनाने तात्काळ कारवाई केली आहे. एका मासे विक्रेत्याने विक्रीसाठी ठेवलेल्या माशांवर आणि आजूबाजूला लाल हिट स्प्रे मारत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. लाल हिट हे झुरळ मारण्यासाठी वापरले जाणारे अत्यंत विषारी रसायन असून अन्नपदार्थांवर त्याचा वापर करणे नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक मानले जाते. या घटनेची माहिती मिळताच वसई-विरार महानगरपालिकेने तात्काळ दखल घेत संबंधित मासे विक्रेत्यावर शॉट कारवाई करत त्याचा माल जप्त केला असून पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरुद्ध अशा प्रकारची कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचा इशाराही महानगरपालिकेकडून देण्यात आला आहे. 
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version