लेखानुदान २०२४ मध्ये कोणासाठी कोणकोणत्या तरतुदी ?

लेखानुदान २०२४ मध्ये कोणासाठी कोणकोणत्या तरतुदी ?

नवी दिल्ली, १ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत गुरुवार १ फेब्रुवारी रोजी लेखानुदान २०२४ सादर केले. लोकसभेची निवडणूक असल्यामुळे यंदा १ फेब्रुवारी रोजी पूर्ण अर्थसंकल्पाऐवजी लेखानुदान सादर करण्यात आले. निवडणुकीनंतर नवे सरकार उर्वरित आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करेल. जाणून घेऊ लेखानुदानात कोणासाठी कोणकोणत्या तरतुदी ?

नऊ ते चौदा गटातल्या मुलींना गर्भाशयाचा कर्करोग होऊ नये यासाठी लसीकरण करणार
आयुष्मान भारत योजना सर्व आशा आणि अंगणवाडी सेविकांना मिळणार
मिशन इंद्रधनुष संपूर्ण देशात राबवणार
देशात सात नवे आयआयएम सुरू करणार
देशातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या संख्येत वाढ होणार

शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी मागील दहा वर्षामध्ये आणलेल्या योजनांमध्ये सुधारणा होणार
शेतकऱ्यांचा माल टिकावा यासाठी गोदामांच्या संख्येत वाढ करणार
आत्मनिर्भर तेलबिया मोहीम
मोहरी, तीळ, सूर्यफुल, शेंगदाणा, सोयाबीन या तेलबिया देशातच तयार करण्याला प्राधान्य देणार
दुग्धोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सर्वंकष योजना
दूध उत्पादकांना दिलासा, राष्ट्रीय गोकुल मिशनसारख्या योजनांना बळ

तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रकल्पांना चालना देण्यासाठी एक लाख कोटी रुपयांचा राखीव निधी

रेल्वेच्या ४० हजार डब्यांचे रुपांतर वंदे भारत डब्यांमध्ये करणार
नमो भारत आणि मेट्रो सेवांचा विस्तार करणार
प्रवासी गाड्यांच्या संचालनात सुधारणा करणार
देशात नवीन १४९ विमानतळ उभारणार, ५१७ नवे विमानमार्ग प्रस्तावित

राज्य सरकारांना आर्थिक बदलांसाठी ७५ हजार कोटी रुपयांचे ५० वर्षांसाठी व्याजमुक्त कर्ज

देशाचा महसूल रुपये २७.५६ लाख कोटी, त्यापैकी २४ लाख कोटी रुपये करांमधील मिळकत, खर्च ४४.९० लाख कोटी रुपये, वित्तीय तूट ५.६ टक्क्यांवरुन ४.५ टक्क्यांवर आणणं हे आमचं उद्दिष्ट, सुधारित वित्तीय तूट जीडीपीच्या ५.८ टक्के आणि २०२४-२५मध्ये ५.१ टक्के राहण्याचा अंदाज

करदात्यांनी दिलेल्या रकमेचा देशाच्या विकासासाठी विचारपूर्वक वापर
आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ४७.६६ लाख कोटी रुपये खर्चाचा अंदाज
आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये २६.०२ लाख कोटी रुपये कर महसूल मिळण्याचा अंदाज
आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ५.१ टक्के राजकोषीय तुटीचा अर्थात फिस्कल डेफिसिटचा अंदाज
आयकर विवरण पत्र भरणाऱ्यांमध्ये दहा वर्षात २.४ टक्के वाढ

कररचनेत कोणताही बदल नाही

वार्षिक उत्पन्न ० ते २.५ लाख रुपये – जुन्या रचनेत ० टक्के कर
वार्षिक उत्पन्न २.५ लाख ते ५ लाख रुपये – जुन्या रचनेत ५ टक्के कर
वार्षिक उत्पन्न ५ लाख ते १० लाख रुपये- जुन्या रचनेत २० टक्के कर
वार्षिक उत्पन्न १० लाखांपेक्षा अधिक रुपये- जुन्या रचनेत ३० टक्के कर

वार्षिक उत्पन्न ० ते ३ लाख रुपये – नव्या रचनेत ० टक्के कर
वार्षिक उत्पन्न ३ लाख ते ६ लाख रुपये – नव्या रचनेत ५ टक्के कर
वार्षिक उत्पन्न ६ लाख ते ९ लाख रुपये – नव्या रचनेत १० टक्के कर
वार्षिक उत्पन्न ९ लाख ते १२ लाख रुपये – नव्या रचनेत १५ टक्के कर
वार्षिक उत्पन्न १२ लाख ते १५ लाख रुपये – नव्या रचनेत २० टक्के
वार्षिक उत्पन्न १५ लाखांपेक्षा अधिक रुपये – नव्या रचनेत २० टक्के अधिक ३ टक्के (प्रत्येक अतिरिक्त लाख रुपयांमागे)

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version