पंतप्रधान मोदी प्रभू रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणार

पंतप्रधान मोदी प्रभू रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणार

अयोध्या, ३ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : अयोध्येत सोमवार २२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रभू रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणार आहेत. यासाठी पंतप्रधान तात्पुरत्या मंदिरातून प्रभू रामाची मूर्ती घेऊन नव्या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करतील. गाभाऱ्यात पंतप्रधानांच्या हस्ते प्रभू रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाईल. पंतप्रधान रामाच्या तीन वेगवेगळ्या मूर्ती हातात घेऊन सुमारे अर्धा किमी. अंतर चालणार आहेत. रामाच्या एका मूर्तीची गाभाऱ्यात प्रतिष्ठापना केली जाईल. दुसरी मूर्ती पहिल्या मजल्यावर आणि तिसरी मूर्ती दुसऱ्या मजल्यावर राम दरबारात ठेवली जाईल. नेमकी कोणती मूर्ती कोणत्या ठिकाणी असेल याची माहिती राम जन्मभूमी न्यासाकडून लवकरच जाहीर केली जाणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version