Jalgaon Crime: अजित पवारांचा निकटवर्तीय विनोद देशमुख अटकेत, जळगावच्या राजकीय वर्तुळात खळबळ

जळगाव शहरातील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विनोद देशमुख यांना अटक करण्यात आली आहे. रामानंदनगर पोलीस ठाण्यात 2022 मध्ये दाखल गुन्ह्यात त्यांना मध्यरात्री अटक करण्यात आली.
Jalgaon Crime: अजित पवारांचा निकटवर्तीय विनोद देशमुख अटकेत, जळगावच्या राजकीय वर्तुळात खळबळ

जळगाव: अजित पवार यांचा निकटवर्तीय विनोद देशमुख अटकेत आहे. त्यामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. व्यावसायिकाच्या कार्यालयावर हल्ला करत दरोडा टाकून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याप्रकरणी जळगाव शहरातील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विनोद देशमुख यांना अटक करण्यात आली आहे. रामानंदनगर पोलीस ठाण्यात 2022 मध्ये दाखल गुन्ह्यात त्यांना मध्यरात्री अटक करण्यात आली. या गुन्ह्यात तब्बल तीन वर्षांनंतर ही अटक झाली असून, देशमुख यांना दुपारनंतर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

हेही वाचा: Devendra Fadanvis On Heavy Rain In Marathwada: मराठवाड्यातील अतिवृष्टीचं कारण काय?, फडणवीस म्हणाले…

दरम्यान या प्रकरणात व्यावसायिक फिर्यादी मनोज वाणी यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्या दबावामुळे पोलीस अटक करत नाहीत असा गंभीर आरोप केला होता. या आरोपानंतर अवघ्या काही दिवसांतच ही कारवाई झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशमुख हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जात असल्याने, त्यांच्या अटकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. परंतु या प्रकरणी पुढे आता नेमकी काय कारवाई होते, हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version