Pakistani Woman Appeals to PM Modi: ‘न्याय मिळाला नाही तर महिलांचा विश्वास उडेल’; पाकिस्तानी महिलेचे पंतप्रधान मोदींना भावनिक आवाहन

निकिता नागदेव नावाच्या या पाकिस्तानी महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, भारत-पाकिस्तानमधील अनेक सामाजिक संस्था आणि कायदेशीर संघटनांचेही लक्ष या प्रकरणाकडे वेधले गेले आहे.
Pakistani Woman Appeals to PM Modi: ‘न्याय मिळाला नाही तर महिलांचा विश्वास उडेल’; पाकिस्तानी महिलेचे पंतप्रधान मोदींना भावनिक आवाहन

Pakistani Woman Appeals to PM Modi: कराचीतील एका महिलेने तिच्या पतीने भारतात दुसरे लग्न करण्याची तयारी केल्याचा गंभीर आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट मदतीसाठी भावनिक आवाहन केले आहे. निकिता नागदेव नावाच्या या पाकिस्तानी महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, भारत-पाकिस्तानमधील अनेक सामाजिक संस्था आणि कायदेशीर संघटनांचेही लक्ष या प्रकरणाकडे वेधले गेले आहे. निकिता नागदेवने सांगितले की, 26 जानेवारी 2020 रोजी तिने कराचीमध्ये हिंदू रितीरिवाजानुसार विक्रम नागदेवशी लग्न केले. विक्रम हा पाकिस्तानी वंशाचा असून दीर्घकाळ इंदोरमध्ये व्हिसावर राहत होता. लग्नानंतर एक महिन्याने, 26 फेब्रुवारी 2020 रोजी विक्रम तिला भारतात घेऊन आला. परंतु काही महिन्यांतच नात्यात गंभीर बदल झाले.

निकिताचा आरोप आहे की 9 जुलै 2020 रोजी विक्रमने तिला ‘व्हिसा तांत्रिक समस्या’चा बहाणा करत अटारी सीमेवर सोडून दिले आणि जबरदस्तीने पाकिस्तानला परत पाठवले. त्यानंतर तिला परत आणण्यासाठी त्याने कोणतीही पावले उचलली नाहीत. आपल्या व्हिडिओ अपीलमध्ये निकिता म्हणते, मी त्याला अनेक वेळा भारतात परत घेऊन जाण्याची विनंती केली, पण तो प्रत्येक वेळी नकार देत होता. आता तो दिल्लीत दुसऱ्या महिलेशी लग्न करण्याच्या तयारीत आहे.

हेही वाचा – India-US Trade Deal : अमेरिकन परराष्ट्र विभागाचे अधिकारी भारत दौऱ्यावर, कोणत्या विषयांवर चर्चा होणार याकडे जगाचे लक्ष

निकिताचे म्हणणे आहे की, तिचा पती आणि त्याच्या कुटुंबाचा लग्नानंतर वर्तनात पूर्ण बदल झाला. तिने गंभीर आरोप केले की विक्रमचे त्याच्या एका नातेवाईकाशी प्रेमसंबंध होते आणि हे सांगितल्यावर तिच्या सासरकऱ्यांनी ते ‘सामान्य गोष्ट’ म्हणत दुर्लक्ष केले. निकिताने सांगितलं की, कोविडच्या काळात विक्रमने तिला पाकिस्तानला परतण्यास भाग पाडले. कायदेशीररित्या मी त्याची पत्नी आहे, पण त्याने मला सोडून दिले. भारतातील प्रत्येक महिलेला न्याय मिळायलाच हवा, असं तिने आपल्या निवेदन म्हटलं आहे. 27 जानेवारी 2025 रोजी तिने या प्रकरणाची लेखी तक्रार दाखल केली.  

मध्यस्थी अयशस्वी झाली

दरम्यान, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने अधिकृत केलेल्या सिंधी पंच मध्यस्थी व कायदेशीर परिषद केंद्राने या प्रकरणाची सुनावणी केली. विक्रम आणि त्याच्या कथित मंगेतरला नोटीस बजावण्यात आली. 30 एप्रिल 2025 च्या अहवालात केंद्राने स्पष्ट केले की हे प्रकरण पाकिस्तानच्या अधिकारक्षेत्रात येते. त्यामुळे विक्रमला पाकिस्तानमध्ये सादर करण्याची शिफारस करण्यात आली. मे 2025 मध्ये निकिताने इंदोर सामाजिक पंचायतीकडेही धाव घेतली होती. पंचायतीनेही समान शिफारस केली.

हेही वाचा –  France Car Accident: फ्रान्समधील ख्रिसमस मार्केटमध्ये अनियंत्रित कारची अनेकांना धडक; 10 जणांचा मृत्यू

जिल्हाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप, चौकशीचे आदेश

इंदूरचे जिल्हाधिकारी आशिष सिंह यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. सध्या निकिताचे मोदींना केलेले भावनिक आवाहन मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिने म्हटलं आहे की, जर मला आज न्याय मिळाला नाही, तर अनेक महिलांचा व्यवस्थेवरील विश्वास उडेल. मी सर्वांना माझ्या पाठीशी उभे राहण्याची विनंती करते. या प्रकरणावर दोन्ही देशांमध्ये संवेदनशील चर्चा सुरू असून, सामाजिक संघटना निकितेला न्याय मिळवण्यासाठी पुढे येत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version