US Tariff: ट्रम्पच्या 100 टक्के औषध टॅरिफवर भारताची प्रतिक्रिया; परराष्ट्र मंत्रालयाने नेमकं काय म्हटलं? जाणून घ्या

ट्रम्प यांनी शुक्रवारी औषध उत्पादनांच्या आयातीवर 100 टक्के कर (टॅरिफ) लादण्याची घोषणा केली आहे. हा कर 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार आहे.
US Tariff: ट्रम्पच्या 100 टक्के औषध टॅरिफवर भारताची प्रतिक्रिया; परराष्ट्र मंत्रालयाने नेमकं काय म्हटलं? जाणून घ्या

US Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी औषध उत्पादनांच्या आयातीवर 100 टक्के कर (टॅरिफ) लादण्याची घोषणा केली आहे. हा कर 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार आहे. ट्रम्प यांच्या घोषणेनंतर भारतानेही प्रतिसाद दिला असून परराष्ट्र मंत्रालयाने प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असल्याचं म्हटलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, मंत्रालय, संबंधित विभाग आणि अधिकाऱ्यांसह घडामोडींवर सतत लक्ष ठेवत आहेत. तसेच भारतीय निर्यातदारांवर या टॅरिफचा संभाव्य परिणाम तपासत आहे. 

रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, 'आम्हाला काल सोशल मीडियावर नवीन शुल्काबाबत सूचना मिळाली. आम्ही औषध आणि इतर उत्पादनांवरील अहवाल पाहून संबंधित मंत्रालये आणि विभाग यांना या प्रकरणाचे बारकाईने निरीक्षण करण्यास सांगितले आहे.'

हेही वाचा – Human Rights Violations: संयुक्त राष्ट्र संघटनेनं 'या' देशातील 68 कंपन्यांना काळ्या यादीत टाकलं; काय आहे यामागचं कारण?

भारत अमेरिकेला सर्वाधिक प्रमाणात जेनेरिक औषधे पुरवतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेत वापरल्या जाणाऱ्या औषधांपैकी एक तृतीयांश पेक्षा जास्त भारताकडून येतात. ही औषधे पेटंट अंतर्गत नाहीत आणि ब्रँडेड आवृत्त्यांपेक्षा स्वस्त आहेत. ट्रम्प यांचा 100 टक्के टॅरिफ ब्रँडेड किंवा पेटंट केलेल्या औषधांवर केंद्रित आहे, आणि या टॅरिफचा परिणाम भारतीय कंपन्यांपेक्षा अमेरिकेवर जास्त होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

हेही वाचा – Modi-Putin Phone Call: 'खोटे आणि निराधार…'; मोदी-पुतिन चर्चेवर नाटो प्रमुखांचा दावा भारताने फेटाळला

ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल या प्लॅटफॉर्मवर म्हटले आहे की, 'ज्या कंपन्या अमेरिकेत औषध उत्पादन कारखाना उभारणार नाहीत, त्यांच्यावर 1 ऑक्टोबरपासून 100 टक्के टॅरिफ लादले जाईल. भारताने या घोषणेवर सध्यातरी दक्षता घेऊन प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version