Gita Gopinath :’डोनाल्ड ट्रम्प यांच्या tariff धोरणाने अमेरिकेला फायदा नाहीच, उलट महागाई वाढली;’ गीता गोपीनाथ यांनी सुनावलं

गीता गोपीनाथ यांनी 'X' पोस्ट करत ट्रम्प यांच्या धोरणावर कठोर टीका केली आहे. ट्रम्प यांचे हे पाऊल मनमानी असल्याचे अनेक जागतिक अर्थतज्ज्ञांचे मत आहे.
Gita Gopinath :’डोनाल्ड ट्रम्प यांच्या tariff धोरणाने अमेरिकेला फायदा नाहीच, उलट महागाई वाढली;’ गीता गोपीनाथ यांनी सुनावलं

Gita Gopinath Criticizes Trump : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काही देशांवर आयात शुल्क (टॅरिफ) लादण्याच्या निर्णयावर त्यांच्याच देशातील अनेकजण सहमत नाहीत. अनेक क्षेत्रांशी संबंधित तज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ त्यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) माजी अर्थतज्ज्ञ आणि अमेरिकेच्या अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी स्पष्टपणे आपले मत मांडताना ट्रम्प यांच्या धोरणावर टीका केली आहे. ट्रम्प यांचे हे पाऊल मनमानी (Arbitrary) असल्याचे अनेक जागतिक अर्थतज्ज्ञांचे मत असून, आता गोपीनाथ यांनीही यात भर घातली आहे. ट्रम्प यांनी काही देशांवर 25 टक्के, तर भारत आणि ब्राझीलसारख्या देशांवर थेट 50 टक्क्यांपर्यंत आयात शुल्क लादले होते.

टॅरिफचा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम
गीता गोपीनाथ यांनी ‘X’ पोस्ट करत ट्रम्प यांच्या धोरणावर कठोर टीका केली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लागू करण्याची घोषणा करून सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला असला तरी, या निर्णयाचा अमेरिकेला फारसा फायदा झालेला नाही. अमेरिकेच्या महसुलात फारशी वाढ झालेली नाही. तसेच, महसुलात जी वाढ झाली आहे, तो महसूल अमेरिकेच्याच जनतेकडून किंवा इथल्या कंपन्यांकडून वसूल करण्यात आला आहे, असे गीता यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – Afghanistan Bagram Airbase: भारतासह ‘या’ प्रमुख देशांचा डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाला विरोध, नेमकं कारण काय?

नकारात्मक परिणाम: टॅरिफ लादल्यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम झाला आहे. ट्रम्प यांच्या घोषणेनंतर जगाच्या व्यापार क्षेत्रात ‘ट्रेड वॉर’ (Trade War) सारखी परिस्थिती निर्माण झाली. चीन, ब्राझील आणि भारतासारख्या देशांशी व्यापारविषयक संघर्ष सुरू झाले.
महागाईत वाढ: अमेरिकेने टॅरिफचा निर्णय जाहीर केल्यानंतर देशात महागाईचा दर (Inflation Rate) वाढला. फर्निचर, कॉफी आणि दैनंदिन घरगुती वापराच्या वस्तू महाग झाल्या आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

महसुलाचा बोजा अमेरिकन कंपन्यांवर
टॅरिफ लावल्याने अमेरिकेला काय फायदा झाला, असा प्रश्न उपस्थित करत गोपीनाथ यांनी महसुलाच्या वाढीबद्दलचे सत्य समोर आणले. त्यांनी  त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय, “अमेरिकेचा महसूल वाढला का? सध्याच्या घडीला जो महसूल वाढला आहे, त्यात अमेरिकेतील कंपन्या आणि नागरिकांचाच वाटा मोठा आहे,” हा निर्णय फायदेशीर नाही: एकूणच, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफबाबत घेतलेला निर्णय फारसा फायदेशीर ठरला नाही, असे गीता गोपीनाथ यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – India foreign policy: चीनच्या आर्थिक डावपेचामुळे वाढली अमेरिकेची डोकेदुखी; दोघांच्या वादात भारताला फटका

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version