जेलेन्स्की आता नाटोवरच चिडले, म्हणाले…

जेलेन्स्की आता नाटोवरच चिडले, म्हणाले…

रशिया-युक्रेन युद्धाचा आज दहावा दिवस आहे. मागील दहा दिवसांपासून रशियाची युक्रेनवर तीव्र लढाई सुरूच आहे. रशिया सतत युक्रेनवर हल्ले करत आहे. या युद्धामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली असून तणावग्रस्त परिस्थिती उद्भवली आहे. दरम्यान, युक्रेनचे राष्ट्रध्यक्ष जेलेन्स्की यांनी नाटोवर नाराजी व्यक्त केली आहे.

युक्रेनचे राष्ट्रध्यक्ष जेलेन्स्की आता नाटोवरच चिडले आहेत. नाटोमुळे रशियाला युक्रेनवर हल्ल्याचा परवाना मिळाला असल्यामुळे जेलेन्स्की यांना संताप अनावर झाला आहे. युक्रेनला ‘नो फ्लाय झोन’ जाहीर करण्याची मागणी जेलेन्स्की यांनी नाटोकडे केली होती. मात्र, नाटोने जेलेन्स्की यांची मागणी फेटाळली आहे. त्यामुळे जेलेन्स्की यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

युक्रेनचे राष्ट्रध्यक्ष जेलेन्स्की म्हणाले, नाटो कमकुवत आणि संभ्रमित झाला आहे. तसेच नाटोच्या निर्णयाने रशियाला युक्रेनमध्ये हल्ल्याची संधी मिळाली आहे. रशिया आणि बेलारूसमधील क्षेपणास्त्रांना हटवा. तसेच मी कीव्हमध्येच असून युक्रेन सोडून जाणार नसल्याचेही ते म्हणाले आहेत. दरम्यान, युक्रेनचा पराभव हा युरोपचा पराभव असल्याचेही जेलेन्स्की म्हणाले.

युक्रेनमधून कोणत्या देशात किती नागरिकांचे स्थलांतर?

बेलारूस      – ५००
रशिया          – ५३,०००
रोमानिया      – ६०,०००
स्लोव्हाकिया – ९०,०००
मालडोवा      – १,००,०००
हंगेरी            – १,५०,०००
पोलंड          – ६,०५,०००

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version