नागालँडमधील मोन जिल्ह्यात काल मध्यरात्री झालेल्या गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. आसाम रायफल्सच्या सेक्युरिटी ऑपरेशनमध्ये या नागरिकांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या घटेनवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी ट्वीटद्वारे या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.
‘हृदय पिळवटून टाकणारा गोळीबार आहे. केंद्र सरकारने खरे उत्तर दिले पाहिजे. आपल्याच भूमीत नागरिक किंवा सुरक्षा कर्मचारी सुरक्षित नसताना गृह मंत्रालय नेमके काय करत आहे?’ असे ट्विट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे.
या प्रकारामुळे नागालँडमध्ये खळबळ उडाली असून मुख्यमंत्री नैफियू रिओ यांनी घटनेचा निषेध करत घडलेल्या प्रकाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नागालॅंडमध्ये घडलेल्या घटनेचा निषेध केला आहे. तसेच राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशीसाठी उच्चस्तरीय एसआयटी नेमली आहे. तसेच पीडित कुटुंबांना न्याय मिळून दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचे अमित शहा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.