Vijay Hazare Trophy 2025: विजय हजारे ट्रॉफीमध्ये विराट कोहलीची तुफान खेळी; सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विक्रम काढला मोडीत

या विक्रमासाठी कोहलीला केवळ 1 धावेची गरज होती. विराटने मैदानात येताच शानदार चौकार मारून आपले खाते उघडले आणि लिस्ट-A कारकिर्दीतील 16,000 धावा पूर्ण केल्या.
Vijay Hazare Trophy 2025: विजय हजारे ट्रॉफीमध्ये विराट कोहलीची तुफान खेळी; सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विक्रम काढला मोडीत

Vijay Hazare Trophy 2025: प्रदीर्घ काळानंतर स्थानिक क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या विराट कोहलीने आपल्या बॅटची जादू पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. 2025-26 च्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये (VHT) आंध्र प्रदेशविरुद्ध दिल्लीसाठी मैदानात उतरताच कोहलीने लिस्ट-A क्रिकेटमध्ये 16,000 धावांचा टप्पा ओलांडून इतिहास रचला आहे.

पहिल्याच चेंडूवर चौकार आणि महाविक्रम

बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स ग्राउंड-1 वर आंध्र प्रदेशविरुद्धच्या सामन्यात दिल्लीचा पहिला गडी बाद झाल्यानंतर विराट कोहली क्रीझवर आला. त्यावेळी संघाची धावसंख्या केवळ 1 धाव होती. या विक्रमासाठी कोहलीला केवळ 1 धावेची गरज होती. विराटने मैदानात येताच शानदार चौकार मारून आपले खाते उघडले आणि लिस्ट-A कारकिर्दीतील 16,000 धावा पूर्ण केल्या.

सचिनला मागे टाकत बनला 'सर्वात वेगवान'

विराट कोहली आता लिस्ट-A क्रिकेटमध्ये 16,000 धावा करणारा केवळ दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा मान केवळ सचिन तेंडुलकर यांच्या नावावर होता. विशेष म्हणजे, विराटने हा टप्पा केवळ 330 डावांमध्ये पूर्ण करून सचिन तेंडुलकरचा (391 डाव) विक्रम मोडीत काढला आहे. विराट आता जगातील 9 वा असा फलंदाज आहे ज्याने या फॉरमॅटमध्ये सोळा हजारांचा टप्पा गाठला आहे.

हेही वाचा – Ishan Kishan: इशान किशनचा 'विराट' अवतार! अवघ्या 33 चेंडूत ठोकलं शतक; तासाभरात मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड

लिस्ट-A क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे दिग्गज: 

ग्राहम गूच – 22,211 धावा 
ग्रीम हिक – 22,059 धावा 
सचिन तेंडुलकर –    21,999 
कुमार संगकारा –    19,456
विव्हियन रिचर्ड्स –    16,995
रिकी पॉन्टिंग –    16,363
गॉर्डन ग्रीनिज    – 16,349
सनथ जयसूर्या    – 16,128
विराट कोहली    – 16,003 

हेही वाचा – Vijay Hazare Trophy 2025 : 36 चेंडूत शतक…वय फक्त 14 वर्ष ! विजय हजारे ट्रॉफीत वैभव सूर्यवंशीने रचला जागतिक विक्रम

आंध्र प्रदेशचे दिल्लीसमोर 299 धावांचे आव्हान

या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आंध्र प्रदेशने निर्धारित 50 षटकांत 8 गडी गमावून 298 धावा केल्या. आंध्रकडून रिकी भुईने 122 धावांची झंझावाती खेळी केली. दिल्लीच्या सिमरजीत सिंगने 5 आणि प्रिन्स यादवने 3 बळी घेतले. आता दिल्लीला विजयासाठी 299 धावांचे लक्ष्य गाठायचे असून, सर्वांच्या नजरा विराट कोहलीच्या मोठ्या खेळीकडे लागल्या आहेत.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version