बुलडाण्यातील पातुर्डा गावकऱ्यांचे पाण्यावाचून हाल

बुलडाण्यातील पातुर्डा गावकऱ्यांचे पाण्यावाचून हाल

बुलडाणा जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बुलडाण्यात क्षारयुक्त पाण्यामुळे अनेक नागरिक मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त आहेत.

बुलडाण्यातील संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. क्षारयुक्त पाण्यामुळे अनेकांना मूत्रपिंडाचे आजार जडले आहेत. त्यामुळे पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी गावकऱ्यांना संघर्ष करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी होणारी भटकंती थांबवण्यासाठी गावातील महिला शक्ती एकवटली आहे. तसेच क्षारयुक्त पाण्यामुळे जीवाचे बरे-वाईट झाले की यासाठी सरकार जबाबदार असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version