Team India Watched ‘Dhurandhar’ : सामने होत राहतील! कर्णधारासहीत संपूर्ण टीम इंडिया गेली ‘धुरंधर’ पाहायला

भारतीय संघ लखनौमध्ये असल्याने त्यांच्या एका झलकसाठी चाहत्यांनी मॉलमध्ये मोठी गर्दी केली होती. मात्र, या खेळाडूंसाठी 'विशेष शो'चे आयोजन करण्यात आले होते.
Team India Watched ‘Dhurandhar’ : सामने होत राहतील! कर्णधारासहीत संपूर्ण टीम इंडिया गेली ‘धुरंधर’ पाहायला

Team India saw Movie Dhurandhar : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेतील चौथा महत्त्वाचा सामना आज लखनौमधील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमवर पार पडणार आहे. या निर्णायक लढतीपूर्वी स्वतःला तणावमुक्त ठेवण्यासाठी भारतीय संघाने सरावातून थोडा वेळ काढला. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासह संपूर्ण खेळाडूंनी एकत्र येत लखनौमधील एका प्रसिद्ध मॉलमध्ये जाऊन मनोरंजनाचा आनंद लुटला.

मल्टीप्लेक्समध्ये चाहत्यांना सुखद धक्का
जेव्हा क्रिकेटमधील हे दिग्गज खेळाडू लखनौच्या 'फीनिक्स पलासियो' मॉलमध्ये दाखल झाले, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या चाहत्यांना मोठा सुखद धक्का बसला. भारतीय संघ लखनौमध्ये असल्याने त्यांच्या एका झलकसाठी चाहत्यांनी मॉलमध्ये मोठी गर्दी केली होती. मात्र, खेळाडूंच्या गोपनीयतेचा आणि सुरक्षेचा विचार करून त्यांच्यासाठी रात्री 10:30 वाजताच्या विशेष खेळाचे (शो) आयोजन करण्यात आले होते.

रणवीर सिंहचा 'धुरंधर' चित्रपट पाहिला
व्यस्त वेळापत्रक आणि सरावाच्या थकव्यामधून बाहेर पडण्यासाठी खेळाडूंनी अभिनेता रणवीर सिंहची प्रमुख भूमिका असलेला 'धुरंधर' हा चित्रपट पाहिला. मैदानावर प्रतिस्पर्ध्यांना घाम फोडणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूंनी पडद्यावरील 'धुरंधर' पाहतानाचा हा काळ उत्साहात घालवला.

हेही वाचा – ICC T20 World Cup: मोठी घोषणा! 42 वर्षीय 'या' खेळाडूवर टी-20 विश्वचषकाच्या कर्णधार पदाची धुरा

कडक पोलीस बंदोबस्त आणि सुरक्षा
भारतीय क्रिकेटपटू सार्वजनिक ठिकाणी येणार असल्याने लखनौ पोलिसांनी सुरक्षेची विशेष काळजी घेतली होती. मॉल परिसरात आणि चित्रपटगृहाच्या बाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. चाहत्यांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी चोख व्यवस्था ठेवली होती, ज्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता खेळाडूंनी आरामात चित्रपटाचा आनंद घेतला आणि त्यानंतर ते सुरक्षितपणे हॉटेलकडे रवाना झाले.

मालिकेच्या दृष्टीने महत्त्वाचा सामना
पाच सामन्यांच्या या टी-20 मालिकेतील आजचा चौथा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत निर्णायक आहे. आता भारतीय खेळाडू आता मैदानात दक्षिण आफ्रिकेच्या आव्हानाचा कसा सामना करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. या 'रिलॅक्स मूड'चा फायदा खेळाडूंना मैदानावर चांगली कामगिरी करण्यासाठी होईल, अशी आशा क्रिकेट चाहत्यांना आहे.

हेही वाचा – IPL Inspiring Story: आई फुले विकायची, वडील मैदान सांभाळायचे; आज मुलगा आयपीएलचा स्टार

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version