Sourav Ganguly : सौरव गांगुली आणि पत्नी डोना कोणाच्या हिटलिस्टवर? महिनाभरापासून येत आहेत जीवे मारण्याच्या धमक्या; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या या प्रकारात सोमवारी अचानक आलेली 2 नवीन पत्रे अत्यंत भयानक आणि आक्रमक भाषेतील होती.
Sourav Ganguly : सौरव गांगुली आणि पत्नी डोना कोणाच्या हिटलिस्टवर? महिनाभरापासून येत आहेत जीवे मारण्याच्या धमक्या; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

Sourav Ganguly and his wife Donna Ganguly Death Threat Letter: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा (BCCI) माजी अध्यक्ष सौरव गांगुली आणि त्यांची पत्नी डोना गांगुली यांना जीवे मारण्याची थेट धमकी देण्यात आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. सौरव गांगुली यांच्या कार्यालयात टपालाद्वारे आलेल्या पत्रांमधून गांगुली दाम्पत्यासह त्यांच्या जवळच्या नातेवाइकांनाही गंभीर इजा पोहोचवण्याची धमकी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे गेल्या 1 महिनाभरापासून अशा प्रकारची आपत्तीजनक आणि धमकीची पत्रे त्यांना सातत्याने मिळत होती, मात्र सुरुवातीला हेटर्सचे कृत्य समजून याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.

सोमवारी आलेल्या 2 पत्रांमुळे वाढली चिंता; अखेर गांगुली कुटुंबाने गाठले पोलीस ठाणे
गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या या प्रकारात सोमवारी अचानक आलेली 2 नवीन पत्रे अत्यंत भयानक आणि आक्रमक भाषेतील होती, ज्यामुळे या प्रकरणाची गंभीरता अधिक वाढली. त्यामुळे सौरव गांगुली यांनी मंगळवारी दक्षिण कोलकाता येथील ठाकूरपुकुर पोलीस ठाण्यात अधिकृत लेखी तक्रार नोंदवली आहे. गांगुली यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत हे पत्र पाठवणाऱ्या व्यक्तीचे नाव 'अरुण' असे नमूद केले आहे.

हेही वाचा – Rohit Sharma : क्रिकेट सोडलं आता हिटमॅनची टीव्ही शोमध्ये एन्ट्री! सोशल मीडियावरील पोस्टने चाहत्यांची उत्सुकता वाढली

उत्तर 24 परगणा जिल्ह्यातून कुरिअर; पोलिसांचे पथक तपासासाठी तैनात
पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत तपासासाठी विशेष अधिकाऱ्यांचे पथक तयार केले आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही संशयास्पद पत्रे उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बेलघरिया भागातून कुरिअरमार्फत पाठवण्यात आल्याचा संशय आहे. तपास पथक सध्या संबंधित कुरिअर एजन्सीच्या नेटवर्कची कसून तपासणी करत असून, संशयिताशी निगडित मोबाईल नंबर आणि सिम कार्डचे लोकेशन ट्रॅक करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

टोळीचा सहभाग आहे का? पोलिसांचा तांत्रिक तपास अन् मौन
गेल्या काही महिन्यांत आलेली सर्व पत्रे ही एकाच व्यक्तीचे डोके आहे की यामागे एखादी संघटित टोळी कार्यरत आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलीस सर्व तांत्रिक बाजू पडताळून पाहत आहेत. आरोपीला लवकरात लवकर बेड्या ठोकल्या जातील, असा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या संपूर्ण घटनेवर आणि धमक्यांच्या पत्रांवर सौरव गांगुली किंवा त्यांच्या पत्नी डोना गांगुली यांच्याकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

हेही वाचा – Harbhajan Singh video: हरभजन सिंगनं शेअर केलेला झोम्बी ड्रग्जचा VIDEO पंजाबचा नाही? व्हायरल व्हिडिओमागील सत्य निराळंच, पोलिसांनी केले फॅक्ट चेक

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version