शिवाजी महाराजांचे इतिहास पुस्तकातून हटवणे चुकीचे – ज्योतिरादित्य सिंधिया

शिवाजी महाराजांचे इतिहास पुस्तकातून हटवणे चुकीचे – ज्योतिरादित्य सिंधिया
राज्यात विधानसभा निवडणूक तोंडावर असताना महाराष्ट्र अंतरराष्ट्रीय शिक्षा बोर्डच्या चौथ्या इय्यतेतील इतिहासाच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्यात आला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात सर्व स्तरावरून टीका करण्यात येत आहे. कोल्हापुरात आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कॉंग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया आले असताना यावर घणाघाती टीका केली आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास पुस्कातून हटवणे चुकीचे असल्याचे ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले ज्योतिरादित्य सिंधिया ?

शिवाजी महाराजांचा इतिहास संपूर्णपणे पुसण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात टीका करण्यात आली आहे.
अंतरराष्ट्रीय शिक्षा बोर्डच्या चौथ्या इय्यतेतील इतिहासाच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्यात आला आहे.
कोल्हापुरच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या युथ कनेक्ट या कार्यक्रमात त्यांनी अनेक विषयांवर संवाद साधला.
इतिहास माहित नसताना वर्तमान घडू शकत नाही. त्यामुळे शिवाजी महाराजांचा इतिहास महत्तवाचे ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले.
त्यावेळी एमआयईबीवर सगळ्यांनी जोरदार टीका केली आहे.
देशात तरुणांना रोजगार हवा असून पाच वर्षात 2 हजारहून अधिक कंपन्या बंद पडल्या आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version