Rishabh Pant 100 Test Sixes Record: ऋषभ पंतचा ऐतिहासिक पराक्रम! कसोटी क्रिकेटमध्ये 100 षटकार ठोकणारा पहिला भारतीय

ऋषभ पंतने कसोटी क्रिकेट कारकिर्दीतील 100 वा षटकार पूर्ण केला आणि अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय फलंदाज ठरला.
Rishabh Pant 100 Test Sixes Record: ऋषभ पंतचा ऐतिहासिक पराक्रम! कसोटी क्रिकेटमध्ये 100 षटकार ठोकणारा पहिला भारतीय

Rishabh Pant 100 Test Sixes Record: भारताचा आक्रमक यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने श्रीलंकेविरुद्ध गॉल येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात मंगळवारी एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला. लहिरू कुमाराने टाकलेल्या लेन्थ बॉलवर शानदार पुल शॉट खेळत पंतने फाइन लेगच्या वरून चेंडू सीमापार धाडला. या उत्तुंग षटकाराच्या जोरावर त्याने कसोटी क्रिकेट कारकिर्दीतील 100 वा षटकार पूर्ण केला आणि अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय फलंदाज ठरला. विशेष म्हणजे याच षटकारासह त्याने कसोटीतील आपले 20 वे अर्धशतकही पूर्ण केले.

जगात फक्त 4 फलंदाजांच्या नावावर 100 षटकार; पंतचा स्ट्राईक रेट सर्वात घातक
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 100 षटकार पूर्ण करणारा ऋषभ पंत हा जगातील अवघा 4 था फलंदाज बनला आहे. या यादीत इंग्लंडचा बेन स्टोक्स 138 षटकारांसह अव्वल स्थानावर आहे, तर न्यूझीलंडचा ब्रेंडन मॅक्युलम 107 षटकारांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक ॲडम गिलख्रिस्ट 100 षटकारांसह तिसऱ्या तर पंत 100 षटकारांसह चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. विशेष म्हणजे दर 49.2 चेंडूंवर एक षटकार मारणारा पंत हा या सर्व खेळाडूंमध्ये सर्वात वेगाने हा टप्पा गाठणारा फलंदाज ठरला आहे.

हेही वाचा – IND vs SL 1st Test Galle: पडिक्कलमुळे केएल राहुल वाचला; मिठी मारून आनंद व्यक्त करतानाच केलं असं काही… मजेशीर प्रसंगाचा VIDEO Viral

आक्रमक फलंदाजीने मिळवला एलिट क्लबमध्ये येण्याचा बहुमान
पंतच्या या वादळी फलंदाजीमुळे भारतीय संघाने सामन्यावर पकड मजबूत केली असून त्याच्या या विक्रमाचे जगभरातून कौतुक होत आहे.
कसोटीतील सर्वाधिक षटकार ठोकणारे फलंदाज:
बेन स्टोक्स – 138 षटकार (दर 90.05 चेंडूंत एक षटकार)
ब्रेंडन मॅक्युलम – 107 षटकार (दर 93.39 चेंडूंत एक षटकार)
ऋषभ पंत – 100* षटकार (दर 49.2 चेंडूंत एक षटकार)
ॲडम गिलख्रिस्ट – 100 षटकार (दर 67.92 चेंडूंत एक षटकार)

हेही वाचा – IND vs SL 1st Test : गॉल कसोटीत दुर्दैवी घटना; सीमेवर चौकार अडवताना दिग्गज खेळाडू जखमी

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version