Prabhsimran Singh IPL 2026 MI vs PBKS | काल मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज हा सामना पार पडला. य सामन्यात मुंबई इंडियन्सने दिलेले 195 धावांच्या लक्षावर पंजाब किंग्जने सहज बाजी मारली. प्रभसिमरन सिंग आणि श्रेयस अय्यर यांनी आक्रमक फलंदाजी करत पंजाबला 21 चेंडू राखून मुंबईवर 7 विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला.
यंदाच्या आयपीएलच्या हंगामात अनेक नवचर्चीत चेहरे पाहायला मिळाले आहेत. अशातच काल झालेल्या सामन्यात पंजाबकडून एक चेहरा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. 25 वर्षीय फलंदाज प्रभसिमरन सिंग याने पंजाब किंग्जकडून मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना तब्बल 11 चौकार आणि 2 षटकारांची स्फोटक खेळी खेळताना अर्धशतक झळकावल आणि मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना अक्षरशः गारद केलं. यावेळी त्याने आपल्या तुफानी फलंदाजीने मुंबई इंडियन्सच्या दीपक चहर, शार्दूल ठाकूर आणि हार्दिक पांड्या यांच्या सारख्या गोलंदाजांच्या तोंडाला फेस आणलं.
शार्दूल ठाकूरच्या एका ओव्हरमध्ये 18 धावा काढत त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. यासह त्याने सलग तिसरे अर्धशतक पूर्ण करत हंगामात आपला जबरदस्त फॉर्म कायम ठेवला आहे. तर श्रेयस अय्यर सोबत भागीदारी करत त्याने नाबाद शतकी खेळी खेळली. सुरुवातीपासूनच प्रभसिमरनने त्याच्या आक्रमक फलंदाजीने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची मोठी तारांबळ उडवली. दरम्यान पंजाब किंग्ससाठी सर्वाधिक अर्धशतक करणारा प्रभसिमरन सिंग हा तिसरा खेळाडू ठरला आहे. यापुर्वी डेव्हिड मिलर आणि शॉन मार्श यांनी हा विक्रम आपल्या नावावर केला आहे
सरपंचजींचा 'तो' झेल अन् संपूर्ण स्टेडियम हक्काबक्का
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने अप्रतिम झेल घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हार्दिक पंड्या धोकादायक ठरत असताना मार्को जान्सेनच्या 18व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर हा झेल पाहायला मिळाला. मार्को जान्सेनचा चेंडू हार्दिकने लाँग-ऑनच्या दिशेने हवेत मारला. चेंडू सीमारेषेबाहेर जाणार असे वाटत असतानाच श्रेयस अय्यरने धावत येत हवेत झेप घेतली. त्याने हवेत असतानाच रिव्हर्स कप पद्धतीने चेंडू पकडला आणि तोल जात असल्याचे लक्षात येताच सीमारेषेआधी झेवियर बार्टलेटच्या दिशेने चेंडू फेकला. त्यानंतर बार्टलेटने झेल पूर्ण केला. रिप्लेमध्ये अय्यरने योग्य वेळी चेंडू सोडल्याचे स्पष्ट दिसले. हा झेल पूर्ण झाल्यानंतर श्रेयस अय्यरने मुंबईच्या प्रेक्षकांकडे पाहत टाळ्या वाजवण्याचे आवाहन केले. स्कोअरकार्डमध्ये हार्दिक पंड्या झेवियर बार्टलेटकडे झेलबाद झाल्याचे नोंदले गेले असले, तरी प्रत्यक्षात हा झेल श्रेयस अय्यरचाच मानला जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.